नांदगाव गावात कृषिदूतांचे आगमन

ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाला वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात
नांदगाव (बारामती झटका)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नांदगाव या गावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न, श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषि महाविद्यालय मोहोद्रे – आचळोली (महाड) येथील कृषिदूत महाड तालुक्यातील नांदगाव या गावात दाखल झाले आहेत. कृषिदूतांमार्फत नांदगाव गावात ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्याक्रमाला कृषिदूतांकडून वृक्षारोपण करून कार्यक्रमांस सुरुवात केली.
कृषिदूतांनी सर्वप्रथम गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सरपंच सौ. शुभांगी फुरसेकर, उपसरपंच सौ. सुजाता पार्टे, ग्रामसेवक संदीप बागडे त्याचबरोबर सुमीत साळुंखे व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

सरपंच, ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून त्यांना गावात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषि महाविद्यालय मोहोद्रे -आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका, व्ही. आर. पवार, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एन. व्ही. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील १२ आठवडे हे कृषिदूत महाड तालुक्यातील नांदगाव गावामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रात्यक्षिकाबरोबरच, शेतकरी मेळावा, शेतीसंबंधी व्याख्याने, शिवार फेरी, कृषि प्रदर्शन, रानभाज्या प्रदर्शन इत्यादी उपक्रम राबविणार आहेत.
कृषि महाविदयालय, मोहोद्रे – आचळोली (महाड) येथील कृषिदुतांमध्ये अथर्व बाबर, आदर्श कदम, सोमनाथ कोळेकर, वेदांत कुलकर्णी, आदित्य पवार, प्रशांत वळकुंदे, अभिजीत माने यांचा समावेश आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.