नंदीवाले समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न मार्गी लावणार – आ. राम सातपुते
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील अनेक गावात नंदीवाले समाजातील लोक राहतात. हा समाज अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगतो. जगण्यासाठी, कामधंदा करण्यासाठी हे लोक सतत ह्या गावातून त्या गावात भटकंती करतात. त्यांचा समावेश खरं तर व्हिजेएनटीमध्ये होतो. पण, भक्कम शैक्षणिक पुरावे नसल्यामुळे या लोकांचे विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले मिळत नाहीत. त्यामुळे नंदीवाले समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही आमदार राम सातपुते यांनी दिली.
दाखले नसल्याने या जमातीतील लोक शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत. तसेच इतर शासकीय सुविधा सुद्धा मिळत नाहीत. याविषयी नुकतेच कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील यांनी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे या समाजबांधवांची व्यथा मांडली. यानंतर आमदार राम सातपुते यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात मी नंदीवाले समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न नक्की मांडतो. तसेच या समाजाला आपण नक्कीच जातीचे दाखले मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर याविषयी कुसमोडच्या माजी उपसरपंच राणी पवार यांनी आमदार राम सातपुते आमच्या समाजाचा हा प्रश्न सोडवतील असे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng