नरखेड येथील फिरोज तांबोळी यांची मंत्रालयात निवड…

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील फिरोज जमादार तांबोळी यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारीपदी (मंत्रालय, मुंबई) येथे निवड झाली आहे.
फिरोज तांबोळी याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नरखेड येथे तर, उच्च माध्यमिक शिक्षण बार्शी येथे झाले आहे. तांबोळी हे सध्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालयात लिपिक टंकलेखक म्हणून कार्यरत आहेत.
मंत्रालयातील कामकाज करीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करून सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर गृह विभाग मंत्रालय, मुंबई या ठिकाणी यश संपादन केले आहे. तांबोळी यांच्या यशाबद्दल नरखेड व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.