ताज्या बातम्या

नातेपुते नगरीचे भूषण युवा उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील काळाच्या पडद्याआड…

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते नगरीचे भूषण सोज्वळ व सौजन्यशील व्यक्तिमत्व असणारे श्री. संतोषआबा वाघमोडे पाटील यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी गुरुवार दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी दुःखद निधन झालेले होते. स्वर्गीय संतोषआबा वाघमोडे पाटील यांच्यावर राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये रात्री ९.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

स्वर्गीय संतोषआबा वाघमोडे पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवनात कष्टातून वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून समाजामध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले होते. त्यांच्या वागण्या, बोलण्यामध्ये विनयता, नम्रता होती. अत्यंत दिलदार मनाचं व्यक्तिमत्व होतं. नातेपुते नगरीचे भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ते नेहमी अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करीत असत. समाजामध्ये स्वकर्तुत्वाने आपली प्रतिमा स्वच्छ व पारदर्शक करून उंचीवर पोहोचलेले होते.

त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच नातेपुते व पंचक्रोशीवर दुःखाची शोककळा पसरलेली होती. संतोषआबांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता मित्रपरिवार, नातेवाईक व तरुण युवकांची रीघ लागलेली होती. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता होणार आहे.

स्वर्गीय संतोषआबा यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व वाघमोडे पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button