नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
बचत गटाचे कर्जाची रक्कम चोरी करणारा आरोपी केला जेरबंद
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता. माळशिरस येथे दि. १२/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:००वा ते ०३:३० वा. चे दरम्यान यशश्री स्वयंसहाय्यता बचत गट नातेपुते च्या अध्यक्षा सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा. नातेपुते, ता. माळशिरस, व सचिव स्वाती रविंद्र पाठक यांनी त्यांचे यशश्री स्वयंसहाय्यता बचत गट नातेपुते यांना मंजुर झालेले कर्ज रक्कम ४,९३,०००/- रु. आयसीआयसी बँक नातेपुते येथील खात्यावरुन काढुन यातील फिर्यादी यशश्री स्वयंसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्षा सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा. नातेपुते, ता. माळशिरस, राहते घरी घेवुन आलो असताना सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ किचनमध्ये चहा बनवायला गवती चहा आणण्यासाठी घराबाहेर गेली असता त्यांचे घरातील शिलाई मशिनवरती सॅकमध्ये ठेवलेले ४,९३,००० रु रोख रक्कम ही सॅकसह कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे उघड्या दरवाज्यातुन प्रवेश करुन चोरुन घेवुन गेले. त्याबाबत यशश्री स्वयंसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्षा सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ यांच्या फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (), प्रमाणे दिनांक १५/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार हे करीत होते.
सदरचा गुन्हा महिला बचत गटाचे वाटप होणारे कर्जाचे रक्कम चोरीच्या संदर्भात असल्याने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याकरीता मा. श्री. अतुल कुलकर्णी साो पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा., श्री. प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा.मा., श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग अकलुज यांनी सक्त सुचना दिल्या होत्या. त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने, सहा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ/२११ राहुल रणनवरे, पोहेका / ८५० नवनाथ माने, पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोना/५६२ राकेश लोहार, पोकॉ/११४५ नितीन पनासे, पोका / २०५८ अस्लम शेख, सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ/०५ युसुफ पठाण यांनी गुन्हा दाखल होताच पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोका / २०५८ अस्लम शेख, यांनी सिसिटीव्ही फुटेज चेक करुन गोपनिय बातमीदारांना सर्तक केले.
पोना/५६२ राकेश लोहार यांनी कौशल्यपुर्ण तांत्रिक विश्लेषन करुन आरोपीचा शोध घेवुन सदर गुन्ह्यात अभिषेक अनिल चव्हाण रा. पोलीस मुख्यालय जवळ, भावनानगर, न्यु पाच्छा पेठ सोलापुर, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर याला ताब्यात घेवुन त्याला विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ३०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (a), प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्यात चोरीस गेलेले ४,९३,०००/- रु. रोख रक्कम सॅकसह व गुन्हा करतेवेळी वापरलेली ५०,०००/- रु. किंमतीची होन्डा कंपनीची Unicorn मोटारसायकल तिचा आर.टी.ओ नंबर MH-42-J-6117 असा एकुण ५,४३,०००/- रु. मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील ग्रामस्थांनी नातेपुते पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोना/५६२ राकेश लोहार हे करीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.