नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

फॅक्टरीतील स्टील चोरी करणारे आरोपी केले गजाआड
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे असलेल्या लक्ष्मी सिमेंट पाईप्स कंपनी मधील ६५,०००/- रु. चे ५ MM जाडीचे ०१ टन वजनाचे लोखंडी स्टिल दि. ०७/०८/२०२४ रोजी रात्रो १०:०० वा. ते दिनांक ०८/०८/२०२४ रोजीचे सकाळी ०८ वाजण्याचे सुमारास अज्ञात आरोपीने चोरुन नेले. याबाबत श्री. किरण केशव कदम रा. कदमवाडी, यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं २९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे दि. ०७/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत होते.
नातेपुते पोलीस ठाणेचे पोना/५५९ वाघमोडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदर गुन्हा करणारे आरोपी मौजे फोंडशिरस, ता. माळशिरस, येथे फॉरेस्टमध्ये संशयितरित्या फिरत आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने नातेपुते पोलीस ठाणेच श्री. महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक यांना माहिती देवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ रवाना करुन मौजे फोंडशिरस ता. माळशिरस येथे सापळा लावुन ०३ आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) दिपक दादा रणदिवे, २) दिपक रामा रणदिवे, ३) संदिप शामराव रणदिवे सर्व रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, असे असल्याचे सांगितल्याने. त्यांना ताब्यात घेवुन अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा आणखिन ०१ साथिदार नामे शहारुख उर्फ शेऱ्या रक्मुद्दीन शेख, रा. फोंडशिरस, यांचे मदतीने नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं २९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीनामे) दिपक दादा रणदिवे, २) दिपक रामा रणदिवे, ३) संदिप शामराव रणदिवे, ४) शहारुख उर्फ शेऱ्या रक्मुददीन शेख सर्व रा फोंडशिरस, ता. माळशिरस, यांना अटक करून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले ६५,०००/- रु. चे ५ MM जाडीचे ०१ टन वजनाचे लोखंडी स्टिल व गुन्हा करतेवेळी वापरलेली ०२,००,०००/- रु. किंमती TATA ACE कंपनीचे टमटम तिचा आरटीओ नंबर MH-10-AQ-3571 असा एकुण २,६५,०००/- रु मुददेमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो. श्री. अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. प्रितम यावलकर सोलापुर ग्रा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. नारायण शिरगावकर अकलुज उपविभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. महारुद्र परजने पोहेकॉ/२११ राहुल रणनवरे, पोहेको / ८५० नवनाथ माने, पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोना/५६२ राकेश लोहार, चापोना/२१६ जावेद अतार पोकों / ११४८ नितीन पन्नासे, पोकों/ २०५८ अस्लम शेख, पोकॉ/९९७ दिनेश रणनवरे व सायबर पोलीस ठाणेचे पोकों/५ युसुफ पठाण यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.