नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
जबरी चोरी करणारा आरोपी केला जेरबंद
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता. माळशिरस येथे दि. ०९/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:१५ वा. सुमारास अज्ञात इसमाने फिर्यादीस नातेपुते येथील शिवशंकर बझारचे समोर मी तुम्हाला कमी किमंतीमध्ये डस्ट देतो माझे सोबत चला असे म्हणून फिर्यादीस नातेपुते शहरातील मधुर मिलन मंगल कार्यालयापासून ०१ किमी अंतरावर बंडगर खोरी येथे नेऊन फिर्यादीस तेथे शिवीगाळी व दमदाटी करून खिश्यात असणारे सर्व पैसे मला दे, असे म्हणून फिर्यादीच्या तोंडावर बुक्या मारून फिर्यादीचे दोन दात पाडून फिर्यादीचे खिश्यातील ५०० रू. दराच्या एकुण १० नोटा असे ५०००/-रूपये जबरदस्तीने काढून घेवून फिर्यादीची २५०००/-रू. किमंतीची मोटार सायकल HONDA कंपणीची ACTIVA त्याचा आरटीओ नंबर MH45-AJ-5103 ही जबरदस्तीने फियादीकडून घेवून तेथून अज्ञात आरोपी पळून गेला आहे. त्याबाबत फिर्यादी नामे रामचंद्र बबन रानगट, रा. कांरूडे, ता. माळशिरस, यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३०३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४),३०९ (६), ३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे दि. ११/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई/धनाजी ओमासे करीत होते.
नातेपुते पोलीस ठाणेचे पोना/५६२ राकेश लोहार यांनी सिसिटीव्ही फुटेज आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदर गुन्हा करणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी मौजे मांडवे, ता. माळशिरस, येथील शिवारात संशयितरित्या फिरत आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने नातेपुते पोलीस ठाणेचे श्री. महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक यांना माहिती देवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ रवाना करुन मौजे मांडवे, ता. माळशिरस, येथे सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) बालाजी हनुमंत पवार रा. खेड भोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर असे असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवुन अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुरनं ३०३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४),३०९ (६),३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल दिल्याने आरोपीनामे बालाजी हनुमंत पवार, रा. खेडभोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, यास अटक करुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले ५,०००/- रु. रोख रक्कमपैकी ३०००/- रूपये रोख रक्कम व जबरीने घेवुन गेलेली २५,०००/- रु. किंमती HONDA कंपनीची ACTIVA त्याचा आर टी ओ नंबर डभ्४५. ।श्र.५१०३ असे एकुण २८,०००/- रु. मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे बालाजी हनुमंत पवार रा. खेडभोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, याचेवर यापूर्वी असलेले दाखल गुन्ह्याची माहीत पंढरपुर शहर पोलीस ठाणे, करकंब पोलीस ठाणे, मोहळ पोलीस ठाणे, कुर्डेवाडी रेल्वे पोलीस ठाणे, दौंड रेल्वे पोलीस ठाणे, अकलुज पोलीस ठाणे येथे चोरी, जबरी चोरी व शरिराविषयक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो. श्री. अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. प्रितम यावलकर सोलापुर ग्रा. मा उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री नारायण शिरगावकर अकलुज उपविभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने, पोसई/धनाजी ओमासे, पोहेकॉ/२११ राहुल रणनवरे, पोहेकॉ / २१८० संदेश पवार, पोहेकॉ / ८५० नवनाथ माने, पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोना/५६२ राकेश लोहार, पोकॉ/११४५ नितीन पनासे, पोका / २०५८ अस्लम शेख, होमगार्ड सुहास पवार व सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ/५ युसुफ पठाण यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा
ventolin us price: Ventolin inhaler – buy ventolin online europe
ventolin online nz
ventolin 200 mg: Ventolin inhaler price – buy ventolin over the counter with paypal
buy prednisone without prescription: prednisone daily use – india buy prednisone online
pharmacies in mexico that ship to usa: medication from mexico – buying prescription drugs in mexico online