ताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक

नातेपुते शिक्षण संस्थेच्या बातमीने राजगुरू, सूर्यवंशी, मोरे आडनाव असणाऱ्या नातेवाईकांचे बारामती झटका संपादक यांना फोन……

बारामती झटका बातमीचा इफेक्ट…
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना नातेपुते येथील शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिष्टमंडळ भेटणार..

बडा राजकीय नेता चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची नातेपुते परिसरात अटक होण्याची कुजबुज सुरू आहे…

नातेपुते (बारामती झटका)

बारामती झटका वेब पोर्टल यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नातेपुते येथील शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिष्टमंडळ भेटणार. बडा राजकीय नेता चौकशीच्या भोवऱ्यात अडकून अटक होण्याची नातेपुते परिसरात कुजबुज सुरू आहे, अशी बातमी प्रसारित केल्यानंतर बातमीचा इफेक्ट होऊन शिक्षण संस्थेत पीडित असणारे राजगुरू, सूर्यवंशी, मोरे अशी आडनावे असणाऱ्या नातेवाईकांनी संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क केलेला आहे. नातेवाईक यांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत. लवकरच शिक्षण संस्थेच्या मुळाशी नातेवाईकांच्या माध्यमातून बिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामती झटका वेब पोर्टल यांनी दिलेल्या बातमीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांनी शिक्षण संस्था, साखर कारखाने, दूध संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, पतसंस्था यांच्या माध्यमातून राजकारण केलेले आहे. नातेपुते येथील सुप्रसिद्ध व जुनी शिक्षण संस्थेत नोकर भरतीच्या वेळी राजकीय हेतू ठेवून नोकरी दिली जात असत. नोकर भरतीच्या वेळी भ्रष्टाचार व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी लवकरच शिष्ट मंडळ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे बडा राजकीय नेता चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची व अटक होण्याची नातेपुते परिसरात कुजबुज सुरु आहे.

महाराष्ट्रात राजकारण करीत असताना अनेक नेत्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे. सदरच्या संस्थेमध्ये नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याशी संबंधित असणारे लोक नोकर भरती व इतर सुविधा दिल्या जात असत. त्यामुळे राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे व गावचे राजकारण करताना शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळे झालेले आहेत. लवकरच नातेपुते येथील शिक्षण संस्थेमध्ये नोकर भरतीची अनियमितता व इतर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भेटणार आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची स्वतःची कोणतीच संस्था नाही मात्र अनियमितता व भ्रष्ट असणाऱ्या संस्थांवर करडी नजर राहणार आहे.

अशा आशयाची बातमी प्रसारित केल्यानंतर नातेपुते पंचक्रोशीत चर्चेला उधाण आलेले होते. पीडितांच्या नातेवाईकांनी संपर्क करून कागदपत्रे सादर केलेली आहेत. लवकरच पिढीतांना न्याय मिळण्याकरता लढा चालूच ठेवला जाणार आहे. पीडित शिक्षक व नातेवाईक यांनी संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा, असे बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल माध्यमातून पिडीतांना आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button