ताज्या बातम्याराजकारण

नातेपुते येथे सिंह आणि ढाण्या वाघाची अविस्मरणीय सदिच्छा भेट.

नातेपुते (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार कलियुगातील भगीरथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे खासदार माननीय श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर उर्फ दादासाहेब यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे धडाडीचे कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या पुणे पंढरपूर रोडवरील नातेपुते येथील शिवसेना भवन या कार्यालयात भेट देऊन कार्यातून शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असणारे राजकुमार हिवरकर पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.

कलियुगातील भगीरथ अशी ओळख असणारे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिवाळीच्या पूर्व संध्येला माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या नातेपुते येथील शिवसेना भवन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तालुकाप्रमुख या नात्याने शिवसेनेने माळशिरस तालुक्यामध्ये केलेल्या कामाचा कार्य अहवाल पाहिला व पाहताक्षणी त्यांच्या असे निदर्शनास आले की एवढ्या सगळ्या बातम्या, एवढी सगळी कामे बघून खूप कौतुक केले. कलियुगातील भगीरथ म्हणून ओळख असणारे खासदार यांनी राजकुमार हिवरकर पाटील यांना शब्द दिला की, माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी जी काही कामे करावी लागतील त्यासाठी मी पुरेपूर आणि जास्तीत जास्त तुम्हास सहकार्य करण्यास तयार आहे.

आरोग्य विभाग तसेच आरोग्य संबंधीच्या वैद्यकीय मदतीसाठी राजकुमार हिवरकर पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक खासदार साहेबांनी केले. तालुक्याच्या विकास कामांसाठी निधीची लागणारी मदत देण्याची त्यांनी ग्वाही दिली. माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न सोडविलेले आहेत. विशेष करून निरा देवधरचा एक दिवसाचा प्रलंबित प्रश्न सोडवून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कलियुगातील भगीरथ आहात, अशी राजकुमार हिवरकर पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, गटनेते दादाभाई मुलाणी, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे, प्रभाग ७ चे प्रमुख सनी बरडकर, शशिकांत बरडकर, भाजपचे मनोज जाधव, युवा मोर्चाचे तेजस गोरे, धनंजय हिवरकर पाटील, जयकुमार शिंदे, स्वीय सहाय्यक शिंदे, सतीश बरडकर आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button