नातेपुते येथील आरती खुडे यांना DSR मार्फत excellent networking award प्रदान

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील आरती करण खुडे यांना DSR मार्फत excellent networking award नुकताच प्रदान करण्यात आला आहे. नाशिक मधील इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट विद्या दराडे व DSR बिझनेस हेड दिलीप राणे सर यांचेकडून लोणावळ्यामधील सेरेनिटी रिसॉर्टला दि. १२ फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडला. पाच हजार ब्युटिशियंसना सोबत घेऊन DSR एक इतिहास रचेल यात काही शंका नाही.
आरती मोहिते खुडे स्वतः एक सक्सेसफुल ब्युटीशियन आहेत. याआधीही त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे यावर्षीचा बेस्ट ब्युटीशन अवॉर्डही अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते मिळवला आहे. अगदीच कमी वयात आणि कमी वेळेत एक नावलौकिक मिळवला आहे.

आरती मोहिते खुडे स्वतः आरतीज मेकओव्हर च्या ओनर आहेत. नातेपुते येथील पेठेत खंडोबा मंदिरा समोर त्यांचे पार्लर आहे. 3 मार्चला त्यांनी स्वतः डीएसआर सेमिनार ऑर्गनाइज केला आहे, जो अनेक ब्युटीशियन्सना सक्सेसफुल बनवू शकतात.
आरती मोहिते खुडे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.