नातेपुते येथील आरती खुडे यांना DSR INDIA मार्फत बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड प्रदान

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते, ता. माळशिरस येथील आरती करण खुडे यांना DSR INDIA मार्फत मुंबई येथील सुप्रसिद्ध हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे इराणी मेकअप आर्टिस्ट कट्टो यांच्या हस्ते बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. दि. 30 जुलै रोजी हा सोहळा पार पडला. देशभरातील 8000 ब्युटिशियन्सपैकी पूर्ण देशातून सहाशे ब्युटिशियन्सची निवड झाली. त्यापैकी अतिशय कमी वेळामध्ये व कमी वयामध्ये नातेपुते मधील आरती खुडे यांनी नावलौकिक केले. ही नातेपुतेकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. याआधीही त्यांना 2024 मध्ये देखील बेस्ट ब्युटिशन अवॉर्ड संभाजीनगर येथे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते मिळाला आहे.
आरती खुडे स्वतः आरतीज मेकओव्हर च्या ओनर आहेत. नातेपुते येथील मेनपेठ मध्ये त्यांचे सलून आहे. त्या स्वतः DSR INDIA च्या BRAND AMBASSADOR आहेत. देशभरातील सर्व ब्युटिशियन्स DSR मार्फत स्वतःचं नाव कमावत आहेत व स्वतःची नवीन ओळख करत आहेत.

त्यांचं म्हणणं असं आहे की, देशातील सर्व ब्युटिशियन्स आणि इतर लोकांना स्वतःची स्वप्ने पहायचा अधिकार आहे. त्यासाठी मी आणि माझी कंपनी त्यांना सहकार्य करते. या सर्व यशाच्या पाठीमागे त्यांच्या मिस्टरांचे त्यांना मोठे योगदान आहे. तसेच त्यासाठी डीएसआर बिजनेस हेड दिलीप राणे, चैताली पानसरे आणि विद्या दराडे यांचे मोठे योगदान आहे. थोड्याच दिवसात सर्व देशभरातील ब्युटिशियन्सनासोबत घेऊन DSR INDIA एक मोठा इतिहास रचेल यामध्ये काही शंका नाही.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



