सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव लोंढे यांचे दुःखद निधन
दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आनंदकुमार लोंढे सर यांना पितृषोक.
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे (वय ८३ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. 14/11/2023 रोजी निधन झाले. ते नातेपुते येथील दै. पुण्यनगरी चे प्रतिनिधी आनंदकुमार लोंढे यांचे वडिल होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, चार भाऊ, भावजय, नऊ पुतणे, आठ पुतणी, जावई, असा परिवार आहे. सदाशिव लोंढे यांच्या निधनाने लोंढे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
परमेश्वर सदाशिव लोंढे यांच्या आत्म्याला शांती देवो आणि लोंढे परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.