नायब तहसीलदारासह दोघे लाच प्रकरणात जेरबंद; उपविभागीय अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार..
सोलापूर (बारामती झटका)
अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले टाटा मेगा पिकअप वाहन दंड भरल्यानंतर सोडण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि स्वतःसाठी लाच घेताना मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्या दोघांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याचीही चौकशी केली जात आहे.
नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर (वय ५५) आणि महसूल सहायक विवेक विठ्ठल ढेरे (वय ३२) या दोघांना या लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगळवेढ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयातच ही कारवाई झाली.
यातील तक्रारदाराचे टाटा मेगा पिकअप वाहन २०२० साली अवैध वाळू वाहतूक करताना सांगोला तहसीलदारांनी पकडला होता. त्यावर १ लाख ३७ हजार ६८४ रूपये दंडाची आकारणी झाली होती, त्यानुसार तक्रारदाराने शासकीय चलनाद्वारे दंडाची रक्कम भरली होती. जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी मंगळवेढ्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्यामुळे तक्रारदाराने त्यानुसार तेथे अर्ज केला होता. मात्र वाहन सोडण्यासाठी तेथीला नायब तहसीलदार सगर आणि महसूल सहायक ढेरे यांनी स्वतःसाठी आणि उपविभागीय अधिकारी (मंगळवेढा) यांच्यासाठी २० हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीत १० हजार रूपयांची लाच देण्याचे ठरले.
दरम्यान, याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात दाद मागिताली. त्यानुसार पडताळणी होऊन मंगळवेढ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला. याच पाच हजार रूपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार व पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hello,
Wondering if you accept guest posts or link inserts on existing posts on baramatizatka.com?
How much would you charge for this?
Justin
4v33ps