निमगाव (म.) येथील शेतकऱ्यांची विकासाकडे वाटचाल – ॲड. एम. एम. मगर मुख्यप्रवर्तक अध्यक्ष, आपला युवक शेतकरी फोरम
केळीचा ४ फुट बुंधा – घडाचे वजन ४८ किलो
निमगाव (म.) (बारामती झटका)
निमगाव (मगराचे) ता. माळशिरस, येथील शेतकऱ्यांची विकासाकडे वाटचाल सुरु आहे. आपला युवक शेतकरी फोरमचे सदस्य श्री. दत्तात्रय मगर हे त्यांच्या शेतात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. त्यांच्या शेतात असणाऱ्या केळीचा बुंधा ४ फुट रुंद असून केळीच्या एका घडाचे वजन सुमारे ४८ किलो भरते आहे. साधारणपणे, एकरी ५ ते ६ लाख उत्पन्न ते घेतात. त्यांनी केळीच्या पैशातुन एक रुपया ही कर्ज न घेता क्रेटा ही चारचाकी नवीन गाडी खरेदी केली. त्या नव्या गाडीची पुजा आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक ॲड. एम. एम. मगर यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी आपला युवक शेतकरी फोरमचे सदस्य, मार्गदर्शक बबन जाधव सर, माजी सरपंच व लेखक हनुमंतराव पवार, माजी मुख्याध्यापक संभाजी मगर, दत्तात्रय मगर, महेंद्र जाधव सर, माऊली मगर, सर्जेराव पवार, राजाराम मगर, अमोल मगर आदी उपस्थित होते.
प्रचंड कष्ट, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय खते, ठिबक सिंचन याचा वापर ते शेतीत करतात. दत्तात्रय सकाळी शेतात गेले, तर परत कधी घरी जेवायला येतील हे सांगता येत नाही असे त्यांच्या परिवारातील इतर सदस्य सांगतात. शेती प्रामाणिकपणाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, केली तर ती काळी आई आपणाला भरभरून देते हे सत्य आहे.
केळी पीक, ऊसपीक एकमेकांच्या सत्याने व मदतीने करण्याचा एक विकसीत ग्रुप आपला युवक शेतकरी फोरम मार्फत केला जात आहे. “तरुणांचा विकास हेच आमचे ध्येय” हे सार्थक ठरविण्याचे काम दत्तात्रय व त्यांच्या ग्रुपने केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक मुख्य प्रवर्तक ॲड. एम. एम. मगर साहेब यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.