निमगाव मगराचे येथे ह. भ. प. श्रीगुरु चैतन्य महाराज देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. प्रभाकर (आप्पा) तुळशीराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
निमगाव (म.) (बारामती झटका)
निमगाव (म.) ता. माळशिरस येथील माजी सरपंच कै. प्रभाकर (आप्पा) तुळशीराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. २८/१२/२०२३ रोजी करण्यात आले आहे यानिमित्त जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य महाराज देहूकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन सकाळी १० ते १२ या वेळेत निमगाव (म.), मळोली रोड येथे करण्यात आले आहे.

घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीप प्रभाकर पाटील, नंदकुमार प्रभाकर पाटील, संजय प्रभाकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या सुश्राव्य कीर्तनास उपस्थित राहून महाप्रसाद घेण्याचे आवाहन समस्त पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.