निमगाव मगराचे येथील श्रीमती सुमनबाई कृष्णात मगर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

माजी सरपंच पांडुरंग कृष्णात मगर यांना मातृषोक…
निमगाव (बारामती झटका)
निमगाव मगराचे, ता. माळशिरस, गावचे माजी सरपंच स्वर्गीय कृष्णात तात्या मगर यांच्या धर्मपत्नी व काकासाहेब सुर्वे यांच्या भगिनी श्रीमती सुमनबाई कृष्णात मगर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 व्या वर्षी बुधवार दि. 28/05/2025 रोजी पहाटे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले पांडुरंगभाऊ, विजयदादा, माऊलीकाका, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. निमगाव मगराचे गावचे माजी सरपंच श्री. पांडुरंग कृष्णात मगर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर निमगाव मगराचे शेजारील स्वर्गीय कृष्णात तात्या मगर राहत असणाऱ्या वस्तीवर आजच सकाळी 9.3o. वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
निमगाव मगराचे गावच्या जडणघडणीत स्वर्गीय कृष्णाततात्या मगर यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांना धर्मपत्नी म्हणून सुमनताई यांचे सहकार्य होते. सुमनताई यांचा स्वभाव सुसंस्कृत व धार्मिक होता. माहेरी व सासरी त्यांनी आध्यात्मिक वारसा जपलेला होता. तात्यांच्या पश्चात मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी सुमनताई यांनी जपलेली होती.
श्रीमती सुमनताई यांच्या दुःखद निधनाने मगर परिवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मगर परिवाराला दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व सुमनबाई यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवून शांती मिळावी, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.