डॉ. राजेंद्र मगर यांचे मराठी भाषेसाठी योगदान – मुख्यमंञी एकनाथराव शिंदे

न. चिं. केळकर पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरवोउद्गार
निमगाव (म.) (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण वाड्मय पुरस्कारातील चरित्रासाठी दिला जाणारा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार निमगाव (म.) माळशिरस येथील डॉ. राजेंद्र सर्जेराव मगर लिखित मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे चरित्रास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंञी एकनाथराव शिंदे होते. रोख एक लाख रूपये, स्मृती चिन्ह व मानपञ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
दि. २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिनाच्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आणि मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुरस्कारार्थीचे मराठी राजभाषेसाठी मोठे योगदान दिल्याचे कबूल केले तर युवकांनी लेखन करत असताना प्रचलित प्रथा मोडीत काढून अनेकानेक प्रांतात लेखन करावे. त्याबरोबर नवनवीन शोध घेत दुर्मिळ आणि अलक्षित व्यक्तिमत्वाच्या महनीय लोकांचा लेखणीद्वारे परिचय करून द्यावा असे आवाहन केले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील लेखकाचे कौतुक केले व विशेष आभार मानले. डॉ. मगर यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीमध्ये संशोधन सहायक म्हणून काम करताना अठरा ग्रंथांचे लेखन-संपादन केले आहे. त्यांनी याच प्रकल्पाअंतर्गत मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे चरित्र लिहिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.