निमगाव येथील सौ. सुमनताई काकासाहेब सुर्वे अनंतात विलीन, हरिनामाच्या जयघोषात अंत्ययात्रा निघाली…
ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे ह. भ. प. काकासाहेब सुर्वे यांना पत्नी वियोग.
निमगाव (बारामती झटका)
निमगाव मगराचे ता. माळशिरस येथील सुमनताई काकासाहेब सुर्वे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अकलूज येथील दवाखान्यात रात्री नऊ वाजता अखेरचा श्वास घेतलेला आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात निमगाव मगराचे येथील स्मशानभूमीमध्ये दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी नऊ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
त्या ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ह. भ. प. काकासाहेब सुर्वे यांच्या धर्मपत्नी होत्या. सुसंस्कृत स्वभाव, शुद्ध आचार, विचार, धार्मिक वृत्ती, या सर्व गुणांनी परिचित होत्या. त्यांना काकी या टोपण नावाने ओळखत असत. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती. त्यामुळे हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रा निघालेली होती. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी निमगाव व निमगाव पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विशेष करून सांप्रदायिक क्षेत्रातील विविध ठिकाणाहून हरिभक्त उपस्थित होते. स्वर्गीय सौ. सुमन काकी यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 07 वाजता होणार आहे. स्वर्गीय सुमन काकी यांच्या आत्म्यास शांती लाभो व सुर्वे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच, बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.