निमकोटेड युरियाच्या नावाखाली खत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट
दरवर्षी हजारो कोटी रुपयांची शेतकऱ्याऊच्या खिशाला कात्री
करमाळा (बारामती झटका)
युरियाचा गैरवापर थांबवावा म्हणून केंद्र सरकारने देशातील संपूर्ण युरियाला निंबोळी तेल लावून युरिया विक्री करावा असे आदेश सर्व खत कंपन्यांना देऊन हे निंबोळी तेल लावण्यासाठी प्रति टन तीनशे रुपये जास्त शेतकऱ्यांकडून वसूल करण्याची परवानगी युरिया खत उत्पादक कंपन्यांना 2019 मध्ये दिली होती.
खत कंपन्यांनी मात्र एक दोन महिना युरियाला निंबोळी तेल लावून बाजारात विक्री केली.
आता मात्र युरियाला निंबोळी तेल लावले जात नाही. प्रति पोते पंधरा रुपये शेतकऱ्यांकडून कंपन्या वसूल करत आहेत. ही कोट्यावधीची रक्कम दररोज खत कंपन्या लुटत आहेत. याकडे कृषी विभाग व केंद्र सरकार लक्ष देणार का ?, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
युरिया हे अत्यंत स्वस्त खत असून या एका खताचे गोणीमागे जवळपास एक हजार रुपये अनुदान केंद्र सरकार कंपन्यांना देते. अनुदानात येणारा युरियाचा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने वापर होतो. प्लायवूड कंपन्या साबण, शाम्पू कंपन्या पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्यांना दुधात मिक्स करण्यासाठी अशा अनेक प्रयोजनासाठी हा अनुदानित युरिया गैरमार्गाने बाजारातून पळवला जातो.
भारताच्या सीमेला चिटकून असलेल्या नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या देशात युरियाची तस्करी होते.
या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने युरियाला निंबोळी तेल लावून त्याचा अर्क मिक्स करण्याचे आदेश दिले होते. हे निंबोळी तेल मिक्स झाल्यामुळे या युरियाचा वास येईल व इतर प्रयोजनाला हा युरिया वापरला जाणार नाही. युरिया लावलेल्या निंबोळी तेलामुळे जमिनीतील रोगराई कमी होईल, या हेतूने केंद्र सरकारने तेल लावलेला युरिया बाजारात विकण्याच्या सक्त सूचना कंपन्यांना दिल्या होत्या. तर कंपन्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नीम तेल न लावता राजरोसपणे युरिया बाजारात विकत आहेत. या पोटी प्रति टन तीनशे रुपये शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे उकळत आहेत.
अण्णा सुपनवर, बळीराजा शेतकरी संघटना –
निम लिपीत युरिया चालू झाल्यानंतर पहिले एक-दोन महिने युरिया वापरताना त्याला निंबोळी तेलाचा वास येत होता. आता कसलाच वास येत नाही लिंबोळी तेल लावलेले नसते, कारण कंपनी आमच्याकडे निंबोळी तेल लावले म्हणून पंधरा रुपये प्रति बॅग जास्त घेत आहे.
केंद्र सरकारने याकडे लक्ष घालावे.
संजय वाकडे
तालुका कृषी अधिकारी, करमाळा –
युरिया खताचे आम्ही नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीला पाठवतो.
तर त्यात लिंबोळी तेल आहे का नाही ही तपासणी केली जात नाही, ही बाब आमच्या कार्यक्षेत्रातील नाही.
बाहेर देशातून मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्या युरिया आयात करतात व ते भारतात विकतात. बाहेर देशात न आलेल्या युरियाला कसल्याही प्रकारची निंबोळी तेल लावण्याची यंत्रणा पोर्टवर नसते तरीसुद्धा या युरिया लिंबोळी तेल लावले म्हणून तीनशे रुपये जास्त दराने देशात विकला जातो, यावर सबसिडी देणारे अधिकारी लक्ष देणार का काही सगळी मिलीभगत आहे अशी चर्चा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Tambi Trzaska
There are obviously wounded and then we only felt half swallow