ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

निरा-नरसिंहपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन.

माळीनगर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेञ निरा-नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंहाचे शनिवारी (दि.29) दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरामध्ये श्री नृसिंहाची पूजा व आरती केली. तसेच पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरात विकासकामांची पाहणी करीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे दर्शनासाठी येतात. भीमा व नीरा या नद्यांच्या संगमावरती प्राचीनकालीन असलेले श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर वसलेले आहे. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचा लक्ष्मी-नृसिंह देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. विजय शिवतारे, आ. राहुल कुल, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. राम सातपुते, वासुदेव काळे, पद्मजादेवी मोहिते पाटील, पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब गावडे, मयुरसिंह पाटील, रंजनकाका तावरे, प्रवीण माने, हनुमंत कोकाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button