निवडणूक खर्चाचे उल्लंघन झाल्यास उमेदवार अपात्र होवू शकतो…
मतमोजणीच्या दिवसापर्यंत उमेदवाराचा खर्च गृहीत धरणार…
सोलापूर (बारामती झटका)
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करण्यात येतो. मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांनी केलेल्या वाहन व अन्य खर्चाचा तपशीलही खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. उमेदवारांना घालून दिलेल्या एकूण ९५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चामध्ये जर उल्लंघन झाले तर संबंधित सदस्याचे सदस्यत्व रद्द होवू शकते.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक प्रचाराकरिता केलेल्या खर्चाचा तपशील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी प्रचारासाठी ८१ लाख ७८ हजार ५६ रुपयांचा खर्च केला आहे. काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रचाराकरिता ७४ लाख ५३ हजार १८१ रुपयांचा खर्च केला.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ६२ लाख ६९ हजार ५९८ रुपयांचा खर्च निवडणुकीसाठी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ५१ लाख ९६ हजार ८०८ रुपयांचा खर्च केला. दरम्यान, सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची माहिती आतापर्यंत तीन वेळा घेण्यात आली.
उमेदवारांनी सादर केलेला खर्च व निवडणूक यंत्रणेकडून गृहीत धरण्यात आलेला खर्च या दोन्हींचा मेळ घालून उमेदवारांच्या खर्चाचे आकडे निश्चित करण्यात येतात. उमेदवारांनी आतापर्यंत सादर केलेला व निवडणूक कर्मचाऱ्यांकडून आलेल्या खर्चाचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर निवडणूक यंत्रणेकडून खर्चाची आकडेवारी निश्चित करण्यात येते. उमेदवारांना याबाबत आक्षेप असल्यास त्यांना यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हरकत घेता येणार आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही उमेदवारांनी यासाठी हरकत घेतली नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
child teen porn