निवासी उप जिल्हाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात…

मौल्यवान वस्तू व रोख रक्कम अशी एकूण किंमत 67,45,308/- रुपये मिळून आले
छत्रपती संभाजीनगर (बारामती झटका)
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकसेवक महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन आणि निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना अँटी करप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
▶️ तक्रारदार = पुरुष वय 49 वर्ष, राहणार – छत्रपती संभाजीनगर
▶️आरोपी – 1)श्री. दिपक त्रिभुवन (वय 40) लोकसेवक – महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर (वर्ग 3)
2) श्री. विनोद गोंडुराव खिरोळकर (वय 51) निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर (वर्ग 1)
▶️तक्रारीचे स्वरूप – तक्रारदार यांनी व त्यांच्या पार्टनर यांनी मौजे तिसगाव, छ. संभाजीनगर येथील 6 एकर 16 गुंठे जमीन ही वर्ग 2 ची असल्याने सदर जमीन शासनाची परवानगी घेऊन सर्व नियमानुसार रजिस्टरी खरेदी खत करून सन 2023 मध्ये विकत घेतली आहे.
सदर जमीन ही वर्ग 2 ची असल्याने ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन जेनरेट करून देण्यासाठी अलोसे 1 व 2 यांनी 23 लाख रुपये मागणी करून यापूर्वी तक्रारदार यांचे कडून 23 लाख रुपये घेतलेले आहे. सदर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी नजराणा शासनास पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी लागणारे चलन पुन्हा जनरेट करून देण्यासाठी आलोसे हे तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांचेकडे लाच म्हणून 18 लाख रुपयेची मागणी करीत होते. अशी तक्रार दि. 23/05/2025 रोजी दिली.
▶️पडताळणी – दि. 23/05/25 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान अलोसे श्री. त्रिभुवन यांनी, आर. डी. सी. साहेबांनी 18 लाख रुपये सांगितले आहे. दि. 26/05/25 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता निवासी उप जिल्हाधिकारी यांचे केबिन मध्ये तक्रारदार, अलोसे विनोद खिरोळकर, अलोसे त्रिभुवन यांच्यात लाच रकमेबाबत बोलणे झाले व 5 लाख रुपये पहिले व फाईल कम्प्लीट झाल्यावर फायनल पेमेंट 13 लाख रुपये रक्कम देण्याचे ठरले.
▶️सापळा कारवाई – दि. 27/05/25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर नगर समोरील रोडवर आलोसे क्र. 1. त्रिभुवन यांनी बोलावल्याप्रमाणे सापळा कारवाईचे नियोजन केले असता तक्रारदार व तक्रारदार यांचे पार्टनर व पंच साक्षीदार यांचे सह थांबले असताना आलोसे हे सदर ठिकाणी आले व तक्रादार यांचे कडून 5 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताच आलोसे यास ताब्यात घेतले आहे. अलोसे श्री. विनोद खिरोळकर यांना स्वतंत्र टीमने लागलीच ताब्यात घेतले आहे.
▶️दि. 27/5/25 रोजी सापळा कारवाईमध्ये आलोसे त्रिभुवन यांनी 5 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारली आहे.
▶️घरझडती – अलोसे यांची घरझडती प्रक्रिया चालू आहे.
▶️ सिटीचा चौक स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
इतर माहिती
आलोसे क्र. 1 दीपक मधुकर त्रिभुवन, महसूल सहाय्यक, आर. डी. सी. विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर,
अलोसे क्र. 2 श्री. विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांना यांनी मौजे तिसगाव छत्रपती संभाजी नगर येथील गट नंबर 225/5 मध्ये 6 एकर 16 गुंठे ही वर्ग 2 ची जमीन शासनाच्या परवानगीने सर्व नियमानुसार रजिस्ट्री खरेदीखत करून सन 2023 मध्ये विकत घेतलेली आहे. सदर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी शासनास पुन्हा नियमानुसार चलन वाढवायचे असल्याने त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी श्री. खिरोळकर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांच्याकडून 18 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती व आलोसे त्रिभुवन यांनी साहेबांशी बोलून तडजोड करून काही कमी होईल का ?, याबाबत बोलणी करू व दि. 26/05/25 रोजी आलोसे क्र. एक व दोन यांनी तक्रारदार यांच्याकडे ठरल्याप्रमाणे लाच रक्कम 18 लाख मागणी करून त्यापैकी 5 लाख रुपये पहिल्यांदा व फाईल कम्प्लीट झाल्यानंतर बाकी राहिलेली लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून दि. 27/5/25 रोजी आलोसे श्री. त्रिभुवन यांनी तक्रारदार यांचेकडून जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर रोडवर पाच लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना पकडण्यात आली आहे म्हणून आलोसे क्र. एक व दोन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिटी चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर शहर या ठिकाणी सुरू आहे.
अलोसे क्र. 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आले
➡️ आरोपींची अंगझडती
आलोसे क्र. 1 याचे कडे एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि तीन हजार रुपये रोख रक्कम.
आलोसे क्र. 2 याचे कडे एक आयफोन 15 प्रो मॅक्स कंपनीचा मोबाईल. व त्यांचे केबिन मध्ये 75,000/रुपये रोख रक्कम मिळून आली.
▶️ सापळा अधिकारी – शांतीलाल चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मोब 8888390777
सहाय्यक सापळा अधिकारी – श्री गोरखनाथ गांगुर्डे पोलीस उपअधीक्षक ला. प्र. वी. छत्रपती संभाजी नगर मो न. 9503736351
पोलीस उपाधीक्षक श्री. दिलीप साबळे, ला. प्र. वी. छत्रपती संभाजी नगर
▶️मार्गदर्शक – श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर. 9923023361
श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मोनं.9881460103
श्री.सुरेश नाईकनवरे पो. उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर मो.न.9923247986
सापळा पथक – पोनि धस, पोनि केशव दिंडे, पोनि चेनसिंग घुशिंगे,पो ह राजेन्द्र सिनकर, इंगळे, पोअं/ अनवेज शेख, युवराज हिवाळे, घूगरे, काळे, जिवडे , कंदे, डोंगरदिवे, इंगळे, राम गोरे, बनकर , नागरगोजे .
ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064 पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :- 02402344050 वर संपर्क साधावा.
आलोसे विनोद गोंडुराव खिरोळकर, पद निवासी उप जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजी नगर, याची घरझडती घेतली असता खालील प्रमाणे मौल्यवान मालमत्ता मिळून आली आहे.
1) रोख रक्कम-13,06,380/-
2) सोन्याचे दागिने – 589 ग्रॅम किंमत अंदाजे, 50,99,583/-
3) चांदीचे दागिने- 3 किलो 553 ग्रॅम किंमत 3,39,345/-
मौल्यवान वस्तू व रोख रक्कम अशी एकूण किंमत- 67,45,308/- रुपये मिळून आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.