निवेदक सुरेश साळुंकेंना उत्कृष्ट निवेदक पुरस्कार प्रदान.

बीड (बारामती झटका)
बीड जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, वैवाहिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्घाटनाच्या अनेक कार्यक्रमात आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आशयघन ओजस्वी आवाजात निवेदन करत भारतीय संस्कृती, समृध्द इतिहास, अध्यात्मिक दृष्टांत देत निवेदन करणारे बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध निवेदक सुरेश साळुंकेंना स्वतंत्र्य सेनानी रामरावजी आवरगांवकर विधी महाविद्यालयाच्यावतीने स्व. से. स्व. रामरावजी आवरगांवकर स्मृतीनिमित्त “जागतिक आनंद दिना”चे औचित्य साधून उत्कृष्ट निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेली अनेक वर्षांपासून बीडच्या सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, वैवाहिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मंत्रमुग्ध करणाऱ्या ओजवी आवाजात सुश्राव्य रसाळ निवेदन करत कार्यक्रमाची उंची वाढवत निवेदन क्षेत्रामध्ये स्वतःची प्रभावी शब्दमुद्रा उमटणारे समर्थांची समर्थवाणी पुस्तकाचे लेखक तथा निवेदक सुरेश साळुंके यांना माजी आमदार राजेंद्रजी जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वातंत्र्य सेनानी रामरावजी आवरगांवकर विधी महाविद्यालयाच्यावतीने स्वा. से. स्व. रामरावजी आवरगांवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चंपावतीनगरी च्या सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, वैवाहिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये निवेदन करत कार्यक्रमाची उंची वाढवत असल्याबद्दल निवेदक सुरेश साळुंकेंचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख धनराशी देऊन सन्मानित करण्यात आले. हा उत्कृष्ट पुरस्कार सुरेश साळुंकेंनी आपल्या दिवगंत बाई-बाच्या चरणी अर्थात आईवडीलांना अर्पण केला आहे.
निवेदक सुरेश साळुंकेंना उत्कृष्ट निवेदक पुरस्कार मिळाल्याबद्दल बीड शहरातील, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.