ऑल इंडिया चॅम्पियन श्री. विष्णू बाळू गोरे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ता. माळशिरस, गावचे थोर सुपुत्र ऑल इंडिया चॅम्पियन श्री. विष्णू बाळू गोरे यांना समाजरत्न पुरस्कार ग्रामपंचायत फोंडशिरस, सयाजीराजे विविध कार्यकारी सेवा सोसायटी फोंडशिरस, महात्मा फुले समता परिषद, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान, श्री संत सावता माळी तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने फोंडशिरस येथील लाड उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानामध्ये सदरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळेस मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील, शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, देविदास ढोपे सरपंच पुरंदावडे, प्रताप झंजे, पोपट बोराटे, सावता ढोपे, हनुमंत पाटील, शिवाजी गोरे, विजयराव हेळकर, तात्याबा बोराटे, दिलीप शेंडे, मारुती गोरे, सावता बोराटे, शिवाजी संपत गोरे, अशोक पलंगे, माणिक गोरे, जयवंत शेंडे, बाळासाहेब बनकर, दशरथ शेंडे, दादा शेंडे, नाना शेंडे, संपत ढोपे, सुभाष मनोज जाधव, दत्ता गोरे, तेजस गोरे, संदीप गोरे, श्रीकृष्ण गोरे, दिलीप पवार, सचिन पवार, गणेश राऊत, कैलास गोरे, गणेश शेंडे, अरविंद शेंडे, युवराज झंजे, अमोल कुदळे, राहुल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरच्या मानपत्रामध्ये विष्णू (अण्णा) आपण बाणलिंगाच्या पायथ्याला वसलेले फोंडशिरस गाव सुसंस्कृत आणि आदर्श बनवण्याचा मनापासून प्रयत्न केलात म्हणून लाड उत्सव सणाच्या निमित्ताने आपल्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण बालपणापासूनच शेती आणि या भूमीच्या मातीवर प्रेम केले. या गावची कुस्ती परंपरा आपण स्वतः जोपासली. तसेच फोंडशिरस गावचे नाव कुस्तीच्या माध्यमातून देशभरात गाजवले. राजकीय जीवनातही आपण आदर्शवाद आणि समाजाभिमुखता या तत्त्वाप्रमाणे वागलात. सरपंच म्हणून अनेक विकासाभिमुख गोष्टींचा पाया घातलात. आपल्या जनहिताच्या आणि जनसामान्यांविषयी असणाऱ्या तळमळीमुळे अनेक संस्था आज मोठ्या ताकदीने उभ्या आहेत.
जमिनीतून हिरवीगार पिके फुलवत राजकीय जीवनातही अनेकांना आपण दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरला आहात आपल्या दारातून कोणताही गरीब कधीही विन्मुख होऊन गेला नाही, यातच आपले मोठेपण आहे. सामाजिक कार्याचे काम करत असताना आपण सत्य आणि न्यायाच्याच बाजूने उभे राहिलात. आपले आत्तापर्यंतचे आयुष्य एका आदर्श अशा जीवनाचा वस्तूपाठ आहे. आपण फोंडशिरस गावचे वैभव आहात, जनसामान्यांचे नेते आहात, आदर्श अशा समाज रचनेचे शिल्पकार आहात आणि मानवतेचे तत्व अंतकरणात घेऊन वावरणारे समाजरत्न आहात. यास्तव फोंडशिरस गावातील तमाम नागरिक व ग्रामपंचायतीच्या वतीने आपणाला समाजरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत, अशा मजकुराचे हे सन्मानपत्र आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Su kaçağı tespiti için Şişli telefon numarası Şişli tıkanıklık açma ekibi, işlerini hızlı ve profesyonel bir şekilde yapıyor, kesinlikle tavsiye ederim. https://www.bondhuplus.com/read-blog/43564