प. पु. सद्गुरू श्री दादानाथ महाराज, मठाधिपती, त्रिपुरा शिवालय पर्णकुटी, फोंडशिरस येथून श्री क्षेत्र किल्ले मच्छिंद्रगड येथे पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात…

फोंडशिरस (बारामती झटका)
सालाबाद प्रमाणे याही वर्षी प. पु. सद्गुरु श्री बाबाआनंद महाराज व प. पु. सद्गुरु श्री तात्यानाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने प. पु. सद्गुरु श्री दादानाथ महाराज मठाधिपती यांच्या हस्ते श्रीक्षेत्र किल्ले मच्छिंद्रगड येथे सप्त पाऊल दंडवत व महाभिषेक कार्यक्रम गुरुवार दि. ३१/७/२०२५ रोजी होणार आहे. त्यानिमित्त मौजे त्रिपुरा शिवालय पर्णकुटी, फोंडशिरस, ता. माळशिरस ते श्री क्षेत्र किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा इथपर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि. २५/७/२०२५ रोजी सकाळी ९ ते शुक्रवार दि. १/८/२०२५ रोजी पर्यंत करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २५/७/२०२५ रोजी दुपारचा विसावा अन्नपूर्णा माता मंदिर, नातेपुते येथे तर, रात्रीचा मुक्काम संत शिप्लागिरी महाराज, शिंगणापूर येथे होणार आहे. यावेळी कीर्तन सेवा ह. भ. प. स्वप्निल महाराज पवार यांची असणार आहे. शनिवार दि. २६/७/२०२५ रोजी दुपारचा विसावा पादुका मंदिर तर रात्रीचा मुक्काम पिंगळी फाटा, दहिवडी येथे असणार आहे. यावेळी कीर्तन सेवा ह. भ. प. संतोष महाराज गाडेकर यांची असणार आहे. रविवार दि. २७/७/२०२५ रोजी दुपारचा विसावा श्री स्वामी समर्थ मंदिर, वडुज येथे तर, रात्रीचा मुक्काम वडुज (उंबर्डे फाटा, कॅनल जवळ) इथे असणार आहे. यावेळी कीर्तन सेवा ह. भ. प. अशोक महाराज शिंदे, गुरसाळे यांची असणार आहे. सोमवार दि. २८/७/२०२५ रोजी दुपारचा विसावा भैरवनाथ मंदिर येथे तर, रात्रीचा मुक्काम ढाकाई देवी मंदिर, राजाचे कुर्ले येथे असणार आहे. यावेळी कीर्तन सेवा ह. भ. प. किशोर महाराज लोखंडे यांचे असणार आहे. मंगळवार दि. २९/७/२०२५ रोजी दुपारचा विसावा श्री राम मंदिर कुरवडी येथे तर, रात्रीचा मुक्काम सप्तपदी मंगल कार्यालय वडगांव येथे असणार आहे. यावेळी कीर्तन सेवा भारुडाचार्य जगन्नाथ महाराज खरात यांची असणार आहे. बुधवार दि. ३०/७/२०२५ रोजी दुपारचा विसावा भैरवनाथ मंदिर शेणोली येथे तर, रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र किल्ले मच्छिंद्रगड येथे असणार आहे. यावेळी कीर्तन सेवा ह. भ. प. अर्जुन महाराज करडुळे यांची असणार आहे.
या पायी दिंडी सोहळ्यातील दैनंदिन कीर्तने दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत होतील. शुक्रवार दि. १/८/२०२५ रोजी त्रिपुरा शिवालय मंदिर, पर्णकुटी, फोंडशिरस येथे सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये गायनाचार्य ह. भ. प. राम महाराज अभंग, इंदापूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिंडी सोहळ्यातील दिंडी चालक गणेश देवडे (गणेशवाडी), दादा वाघमोडे पाटील (फोंडशिरस), रामचंद्र बापूराव वाघमोडे (पाटील), आबाजी महादेव बोराटे हे आहेत. तर या दिंडी सोहळ्याचे नियोजन सुरेश ढमाळ (डोर्लेवाडी) व एकनाथ पाडुळे यांनी केले आहे. तर सोमनाथ महाराज मोरे (डोर्लेवाडी) हे दिंडी सेवक आहेत. तसेच अर्जुन महाराज करडुळे यांच्यावतीने काकड आरती असणार आहे. तर या दिंडी सोहळ्यात मारुती राऊत, राजेंद्र लुनिया, अनंत कायगुडे, तुषार सदाशिव कायगुडे (गणेशवाडी) हे चोपदार आहेत. त्याचबरोबर लालासाहेब नारायण कायगुडे यांची पालखी रथासाठी बैलजोडीची सेवा असणार आहे. तसेच यावेळी सुरेश श्रीराम, गणेश देवकाते, पोपट दुरगुडे, पांडुरंग दुरगुडे व बबन दुरगुडे हे अब्जेगिरी असणार आहेत. युवराज पाटील व दादा ढोपे यांच्याकडून मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी मानाचा घोडा असणार आहे. तर यावेळी दिंडी प्रमुख मल्हारी कायगुडे व भगवान बोराटे हे असणार आहेत. तर अशोक मदने, आर्यन कायगुडे, अजय खरात यांचे दिंडी सूचक मंडळ असणार आहे. या सोहळा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेवेळी हार्मोनियम मास्टर मधुकर मराळे, मृदुंगाचार्य – बापु पारसे, दादा महाराज भवर, तबला – अप्पा वाघमारे, कुंडलिक वसव, गायनाचार्य – राजू रामदास, योगेश पारसे, विणेकरी – नारायण दातीर, बाळासाहेब कायगुडे हे असणार आहेत. श्री क्षेत्र किल्ले मच्छिंद्रनाथ दिंडीला गणेशवाडी ग्रामस्थांचे सहकार्य असणार आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



