ताज्या बातम्यासामाजिक

पाच हजार फॉलोवर्स इंस्टाग्रामवर झाले, वर्षात पन्नास हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करणार संपादक श्रीनिवास कदम पाटील..

बारामती झटका न्यूज हितचिंतक, वाचक, प्रेक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सहकार्याने पुढील वाटचाल जोमाने सुरू राहणार….

माळशिरस (बारामती झटका)

बदलत्या काळानुसार सोशल मीडिया बदलत गेला, त्यामुळे बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर केले. बारामती झटका वेब पोर्टल वाचणाऱ्या वाचकांची संख्या तीन कोटीच्या आसपास गेलेली आहे. तर बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दीड कोटी च्या आसपास गेली आहे. बारामती झटका यूट्यूब चॅनलची एक बातमी 30 लाख 40 हजार गेली असून साठ हजार प्रेक्षकांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे.

वेब पोर्टल व युट्युब चॅनल सोशल मीडियाच्या बरोबरीला इंस्टाग्राम सुरू केलेले होते. अल्पावधीमध्येच 5000 फॉलोवर्स इंस्टाग्रामवर झालेले आहेत. आत्तापर्यंत 371 पोस्ट टाकलेल्या आहेत. तर 379 फॉलोविंग आहे. इंस्टाग्राम वरील बातमी 1.1 M म्हणजे 11 लाख लोकांनी पाहिली आहे. दुसऱ्या सुद्धा बातम्या पाच लाख, सहा लाख, चार लाख, तीन लाख अशा पाहिलेल्या आहेत. महिन्याला इंस्टाग्राम वर 16 लाख लोकांची बातमी पाहिलेली नोंद झालेली आहे. फॉलोवर्स पाच हजार झालेले आहेत, त्याबद्दल बारामती झटका न्यूज वेब पोर्टल, युट्युब चॅनल, इंस्टाग्राम व फेसबुक सर्व हितचिंतक वाचक, प्रेक्षक, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या सहकार्याने सर्व काही झालेले आहे. त्याबद्दल बारामती झटका संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील, मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्या वतीने सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा… गौराई आगमनाच्या दिवशी 5000 फॉलोवर्स पूर्ण झालेले आहेत. पुढच्या गौरीगणपती येईपर्यंत 50 हजार फॉलोवर्स करण्याचा मानस आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

https://www.instagram.com/baramatizhatkanews_?utm_source=qr&igsh=azhnYjJ5emR2cjFm

बारामती झटका वेब पोर्टल व युट्युब चॅनलची समाजामध्ये वाटचाल सुरू असताना 90% लोकांची सहकार्याची भावना आहे तर बोटावर मोजणारे 10% लोक टीका टिप्पणी करीत असतात मात्र, टीकाटिपणीला उत्तर न देता बारामती झटका न्यूज चॅनलची खडतर रस्त्याने सुद्धा दमदार वाटचाल हितचिंतकांमुळे सुरू आहे. ग्रामीण भागातील न्यूज चॅनल असल्याने त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, ग्रामीण भागातील सण उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस, जागरण गोंधळ, अशा बातम्यांना प्राधान्य देऊन बारामती झटका न्यूज चॅनलची भविष्यात अशीच वाटचाल सुरू राहणार आहे.

टीका-टिपणी, मान-अपमान अशा गोष्टींकडे लक्ष न देता हितचिंतक, वाचक, प्रेक्षक, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या सहकार्याने पुढील वाटचाल जोमाने सुरू राहणार असून तळागाळातील वंचित, शोषित व पिढीत जनतेबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी मानस बोलून दाखवलेला आहे.

अजून कोणी बारामती झटका यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व बारामती झटका इंस्टाग्रामला फॉलो करून सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom