पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी शेतीपंपाची वीज एक तासाने वेळ वाढविण्यासाठी महावितरणला आदेश द्यावेत…

उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे.
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे आज रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने उन्हाळ्याच्या झळा वाढलेल्या आहेत. पाण्याची कमतरता भासत असल्याने शेती पंपाची वीज एक तासाने वेळ वाढविण्यासाठी महावितरण कंपनीला पालकमंत्री यांनी आदेश द्यावेत, अशी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे.
माळशिरस तालुक्यात वेगवेगळ्या फिटर मधून शेतीपंपाच्या विजेच्या वेळा निश्चित केलेल्या आहेत. सकाळी 08 ते सायंकाळी 04, सायंकाळी 04 ते रात्री 12 व रात्री 12 ते सकाळी 08 असे महावितरण कडून वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रात्री 12 ते सकाळी 08 या वेळेमध्ये एक तास वाढवून सकाळी 09 वाजेपर्यंत करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीला व शेती पंपाला पाणी कमी असते त्यामुळे पहिला साठपा काढल्यानंतर दुसरा साठपा जमा होण्याकरता वेळ लागतो. काही शेतकऱ्यांना भर रात्रीचे एकटे शेतात पाणी धरण्याच्या अडचणी असतात त्यामुळे पहाटे शेतामध्ये जात असतात. दिवसभर लागणारे जनावरे व सांडपाण्यासाठी पाणी सकाळी भरावे लागते. गुरांचे शेण-घाण, धारा-पाणी करेपर्यंत वेळ गेलेला कळत नाही. तोपर्यंत 08 वाजलेल्या असतात त्यामुळे अनेक वेळा जनावरांना व सांडपाण्याचे पाणी एमएसईबी च्या वेळेमुळे भरता येत नाही. त्यामुळे सकाळी आठ आहे त्याऐवजी नऊ वाजता करून एमएससीबी ने उन्हाळ्यातील लाईटची एक तासाने वेळ वाढवण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एमएसईबी ला आदेश द्यावेत. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वास आहे, पालकमंत्री शेतकऱ्यांची वाढलेली मागणी पूर्ण करतील.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.