ताज्या बातम्याराजकारण

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे भाजपची व संघाची ताकद वाढणार, वळव पाडणाऱ्यांना वठणीवर आणणार….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याचा पदभार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. चंद्रकांतदादा पाटील संघाच्या व भाजपच्या मुशीमध्ये वाढलेले असल्याने सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पदावर काम करीत असताना चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पक्षाची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद वाढवतील व भाजपमध्ये नव्याने आलेल्या भाजपच्या खुर्द नेते व कार्यकर्ते वळव पाडणाऱ्यांना वठणीवर आणणार अशी चर्चा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या बुद्रुक गटामध्ये सुरू झालेली आहे.

चंद्रकांतदादा पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री पालकमंत्री पदावर काम करीत आहेत. पुणे पदवीधर मतदार संघातून पहिल्यांदा आमदार झालेले चंद्रकांतदादा पाटील यांचे पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यामध्ये योगदान आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. काही भारतीय जनता पक्षामध्ये अतृप्त नेते व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका टिपणी करीत आहेत. भाजपच्या ध्येयधोरणामध्ये बसत नाही, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरब्बी व तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ माहीत असणारे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी निश्चितपणे दिलेली असणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्यामुळे भाजपमधील अंतर्गत बंडाळी बंद होऊन भाजपची व संघाची ताकद भविष्यात वाढणार आहे. वळव पाडणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी चंद्रकांतदादांना कोण्या ज्योतिषाची गरज लागणार नाही, असेही भाजपच्या बुद्रुक गटातून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button