पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा अकलूज येथे अभिनंदनाचा बॅनर फाडला ….
गुन्हा दाखल करणार – भाजपा शहर अध्यक्ष महादेव कावळे
अकलूजकरांनो सावधान वाघाचा बॅनर फाडला, भविष्यात किंमत मोजावी लागेल कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा शुभेच्छा अभिनंदनाचा बॅनर अकलूज ता. माळशिरस, येथे समाजकंटकांनी फाडला असल्याने भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित बॅनरची माहिती पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे. अकलूजकरांनो सावधान, वाघाचा बॅनर फाडला. भविष्यात किंमत मोजावी लागेल, कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना येत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारचे खातेवाटप होऊन पालकमंत्री यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिलेले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्रीपद मिळू नये, यासाठी असंतुष्ट व राजकीय विरोधक यांनी देव पाण्यात ठेवलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पालकमंत्री पदाची यशस्वीपणे जबाबदारी जयकुमार गोरे सांभाळतील अशी खात्री असल्याने सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपदी ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
सातारा जिल्ह्यातील माण खटाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असले तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात पालकमंत्री जयाभाऊ गोरे झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोषाने फटाक्यांची आतिषबाजी व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केलेला होता.
माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी अभिनंदन शुभेच्छांचे बॅनर लावण्याचे काम सुरू आहे. अकलूज-माळेवाडी नगरपंचायत हद्दीतसुद्धा बॅनर लावण्याचे काम सुरू आहे. 100 बॅनर तयार झालेले आहेत, अजून 220 बॅनर लावणे बाकी आहे. तोपर्यंत अकलूजचे समाजकंटक यांचा इगो जागा झाला. नगरपंचायत हद्दीतील बोर्ड फाडल्याने वातावरण संतप्त झालेले आहे.
वाघाचा बोर्ड फाडला, समाजकंटकांना वाघाचे कार्यकर्ते फाडून काढतील अशी संतप्त प्रतिक्रिया महायुतीच्या कार्यकर्त्यांतून येत आहे. अकलूजकरांना माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राजकारणातील त्रिमूर्ती कायम डोळ्यासमोर दिसत आहेत. राजकारणातील जय आणि वीरूची जोडी इतिहासातील धनाजी-संताजी सारखी अकलूजकरांना वाटत असल्याने समाजकंटक आपली औकात दाखवत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.