पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाण्याचा शब्द पाळला – चेतनसिंह केदार सावंत

सत्कार स्वीकारण्याआधी सांगोल्यासाठी राजेवाडी तलावातून पाण्याचे आवर्तन सुरू
सांगोला (बारामती झटका)
सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावातून पाणी सोडण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाण्याचा शब्द पाळला असून सांगोल्यातील नागरी सत्कार स्वीकारण्याआधी सांगोल्यासाठी राजेवाडी तलावातून पाण्याचे आवर्तन सुरू केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती सांगितली. तालुक्यातील खवासापूर, लक्ष्मीनगर, चिकमहुद, नराळेवाडी व वाकी गावांना राजेवाडी तलावातून प्रत्येक वर्षी पाच आवर्तने सोडण्यात येतात. परंतु चालू वर्षी उन्हाळी आवर्तने प्रकरण प्रसिद्ध केले नाही. सदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस, डाळींब, केळी अशी पिके आहेत. सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजेवाडी तलावातून उन्हाळी आवर्तने प्रसिद्ध करून वरील गावांना पाणी सोडण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

या मागणीची जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दखल घेतली असून राजेवाडी तलावातून सांगोला तालुक्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. गुरुवार ३ एप्रिल रोजी सांगोल्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कार स्वीकारण्याआधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजेवाडी तलावातून सांगोल्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.