ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मण बनपट्टे सह 13 जणांवर मोका अंतर्गत कारवाई…

अकलूज नगरी गुन्हेगारीचे माहेरघर, प्रस्थापितांनी गुंडगिरी, दडपशाही व गुंडागर्दीवर सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे….

अकलूज (बारामती झटका)

अकलूजची राजकीय व सहकाराची पंढरी म्हणून ओळख होती. परंतु दोन दशकांमध्ये अकलूज नगरी गुन्हेगारीचे माहेरघर ठरत आहे. प्रस्थापितांनी गुंडगिरी दडपशाही व गुंडागर्दीवर सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली स्वतःची पोळी भाजून घेतलेली आहे. अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील 13 लोकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1919 चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) च्या अंतर्भाव कलम व कायदा अन्वये पोलीस प्रशासनाने मोका प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे वय 29 रा. इंदिरा घरकुल अकलूज, बाजीराव हनुमंत सरगर रा. खुडूस, शंकर अशोक काळे वय 33 रा. इंदिरा घरकुल, लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे वय 42 रा. महादेव नगर अकलूज, राजू ज्ञानेश्वर काळे वय 34 रा .इंदिरा घरकुल, अर्जुन दत्ता चौगुले वय 24 रा. इंदिरा घरकुल, अतुल दत्तात्रय काळे वय 28 रा. इंदिरा घरकुल, आकाश रमेश धोत्रे वय 25 रा. इंदिरा घरकुल, बाळू भारत मदने रा. माऊली चौक माळशिरस, रोहित मारुती काळे वय 26 रा. इंदिरानगर, सलीम अब्दुल तांबोळी वय 25 रा. इंदिरा घरकुल, मनोज अशोक काळे रा. इंदिरा घरकुल, किशोर राजेंद्र नवगण वय 28 रा. जुना बाजारतळ अकलूज अशा तेरा लोकांवर मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे.

माळशिरस तालुक्यात विशेष करून अकलूज पंचक्रोशीमध्ये प्रस्थापितांनी आजपर्यंत राजकारण करीत असताना अशा लोकांचा वापर करून गोरगरीब व सर्व सामान्य जनतेवर अन्याय केलेला आहे. समाज माध्यमांमधून माळशिरस तालुक्याची बीडकडे वाटचाल असल्याचे भासवले जात आहे. मात्र, माळशिरस तालुक्यात बिहार पहिलाच झालेला आहे. अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील 13 लोकांवर मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. मोका अंतर्गत कारवाई झालेले तेरा लोक कोणाच्या संपर्कात होते, ते तालुक्याला माहित आहे.

पोलीस प्रशासन यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेतून स्वागत होत आहे. पोलीस प्रशासनाने प्रस्थापितांनी माळशिरस तालुक्यात अजून किती सांगाडे दफन व दहन केलेले आहेत, याचीही गोपनीय माहिती घेणे गरजेचे असल्याचे अकलूज पंचक्रोशीत दबक्या आवाजात बोलले जात आहे. निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस माळशिरस तालुक्यातील विशेष करून अकलूजच्या जनतेच्या मनातील गुंडगिरी व दडपशाही घालवण्याकरता निश्चितपणे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पाऊल उचलून अकलूज पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याच्यासाठी निश्चितपणे अलर्ट राहतील असा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला विश्वास आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom