पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी फोंडशिरस येथील शेतकऱ्यांची अडचण तात्काळ दूर केली…

मा. आ. राम सातपुते यांच्या सततच्या प्रयत्नाला यश, तात्काळ १०० केवीचा डीपी शेतकऱ्यांच्या बांधावर…
फोंडशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या बोराटवाडी येथील कमलकुंज निवासस्थानी भाजपचे नेते सुनीलजी गोरे यांनी भेट घेऊन फोंडशिरस येथील बाबुराव पाटील शंभर केवी डीपी अनेक दिवस बंद असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होती. ती अडचण पालकमंत्री यांनी अधीक्षक अभियंता यांना फोन करून तात्काळ डीपी देण्याचे आदेश देवून सोडवली. त्याप्रमाणे दुपारी ३ वाजता शंभर केवीचा डीपी फोंडशिरसच्या बाबुराव पाटील डीपीवर आलेला होता.
सदरचा डीपी लवकर यावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचाही सततचा प्रयत्न सुरू होता.


बाबुराव पाटील डीपीवर १०० केवीचा डीपी आल्यानंतर सदर ठिकाणी बाबुराव कुंडलिक पाटील, सुधीर गणपत चव्हाण, सुरेश बाळू भगत, सोमनाथ जालिंदर चव्हाण, शिवाजी कुंभार मेडदकर, अशोक भगवान पारसे, हरी तुकाराम रणदिवे, युवा नेते पै. कृष्णा ढोबळे व किंगमेकर युवा नेते सुनिल विष्णू गोरे यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांची अडचण दूर झाल्याने बाबुराव कुंडलिक पाटील यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे विशेष आभार मानले तर, सोमनाथ जालिंदर चव्हाण यांनी डीपी बसवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



