पालकमंत्री पत्नी सौ. सोनिया जयकुमार गोरे यांची मांडवे गावचे ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

सौ. सोनिया गोरे यांचा सन्मान माजी सरपंच सौ. शितल दुधाळ यांनी केला तर मा. आ. राम सातपुते यांचा माजी व्हाईस चेअरमन हरिभाऊ दुधाळ व गंगाराम दुधाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला..
मांडवे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या धर्मपत्नी सिद्धनाथ पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका भाजपच्या प्रांतिक सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी मांडवे गावचे ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच बबनबापू पालवे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हिवरकर पाटील, शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई शरदराव मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीताताई संजय मोटे, यांच्यासह मांडवे पंचक्रोशीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


अतिथी देवो भव या न्यायाने पालकमंत्री पत्नी सौ. सोनिया गोरे यांचा मांडवे गावच्या माजी सरपंच शितल अर्जुन दुधाळ यांनी सन्मान केला तर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा मांडवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन हरिभाऊ दुधाळ व गंगाराम दुधाळ यांच्या शुभहस्ते सन्मान झाला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान दुधाळ परिवार यांच्या वतीने करण्यात आला.
श्री संत सावता माळी देवस्थान गिरवी येथे सभामंडप भूमिपूजनासाठी सौ. सोनिया गोरे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या. त्यांनी आवर्जून ज्येष्ठ नेते अर्जुन दुधाळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती. यावेळेस महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. सोनिया गोरे यांच्या माळशिरस तालुका दौऱ्याने माळी समाजामधील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. भविष्यात माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सोनिया गोरे यांचे संघटन कौशल्य, भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती राहील असे महिलांना सौ. सोनिया गोरे यांच्या चर्चेमधून जाणवत होते.
पालकमंत्री पत्नी सौ. सोनिया गोरे व मा. आ. राम सातपुते दुधाळ परिवार यांच्या निवासस्थानी आल्याने दुधाळ परिवार यांच्या आनंदाला पारावर उरलेला नव्हता.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



