सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल… पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना १४३ कोटी ४७ लाख २५ हजाराचा निधी

बंधितमधून ८६ कोटी ७ लाख ५५ हजार तर अबंधितमधून ५७ कोटी ३९ लाख ७० हजार
सोलापूर (बारामती झटका)
केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मावळत्या आर्थिक वर्षात १४३ कोटी ३९ लाख ७० हजाराचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये बंधितमधून ८६ कोटी ७ लाख ५५ हजार तर अबंधितमधून ५७ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये निधीचा समावेश आहे.
बंधित निधीतून पहिल्या हफ्त्यासाठी ९७७ ग्रामपंचायतींना ४२ कोटी ५३ लाख १७ हजार तर २९ मार्च रोजी प्राप्त झालेल्या दुसऱ्या हफ्त्यात ८४८ ग्रामपंचायतींना ४३ कोटी ५४ लाख ३८ हजाराचा निधी प्राप्त झाला आहे.
अबंधित निधीतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९७७ ग्रामपंचायतींना २८ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा तर दुसऱ्या हफ्त्याद्वारे २१ मार्च रोजी ८४८ ग्रामपंचायतींना २९ कोटी २ लाख ८० हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला.
अशाप्रकारे बंधित व अबंधितमधून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १४३ कोटी ४७ लाख २५ हजाराचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.
लेखापरीक्षण न करणाऱ्या, प्रशासकीय कारभार असणाऱ्या २२३ ग्रामपंचायतींचा पंधराव्या वित्त आयोगातील निधी वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झालेला पंधराव्या वित्त आयोगातील प्राप्त निधी थेट संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
निधी वर्ग करण्यात आलेल्या ग्रामपंचायतची, तालुकानिहाय संख्या व निधी
तालुका ग्रामपंचायत संख्या अबंधित निधी
अक्कलकोट १०२ ३९५८४०००
बार्शी १०६ ३५५५८०००
करमाळा ९४ ३७६६५०००
माढा ७८ ४१९८८०००
माळशिरस ८६ ५३९७३०००
मोहोळ ७६ ३२७४६०००
मंगळवेढा ६० ३४१५१०००
उत्तर सोलापूर ३४ २७४०६०००
पंढरपूर ७२ ४०२४५०००
सांगोला ६४ ४०८५१०००
दक्षिण सोलापूर ७६ ५१२७१०००
एकूण ग्रामपंचायत ८४८
एकूण निधी ४३५४३८०००
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.