पंढरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

पालकमंत्र्यांसह, आमदार, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थीती
सर्व धनगर समाजातील डॉक्टरांकडून एकाच वेळी उपस्थिती
पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपूर शहर आणि तालुका मध्यवर्ती राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राज्यांचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आरती केली व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर राज्यभर मंडलनिहाय जयंती साजरी करून अहिल्यादेवींच्या विचाराचे उदात्तीकरण केले, त्याबद्दल मंडळाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडी व काठी देऊन सन्मान केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ ढोणे, उपाध्यक्ष प्रवीण सलगर, श्रीकांत दादा देशमुख, पंकज देवकते, प्रशांत घोडके, प्रसाद कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने बहुजन समाजबांधव ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा बांधव, शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनीही उपस्थित राहुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे, व्हा. चेअरमन भारत कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संसारे यांचेसह पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ दिवसभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यासह विविध कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



