पंढरपूर येथे रविवारी निर्यातक्षम केळी परिसंवादाचे आयोजन
शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे सचिन कोरडे पाटील यांचे आवाहन
पंढरपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त निर्यातक्षम केळी परिसंवाद तसेच दूध परिषद कृषी मेळावा रविवार दि. २४ रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केळी उत्पादक शेतकरी संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे पाटील यांनी केले आहे.
याबाबत श्री. कोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पंढरपूर येथे संस्कार मंगल कार्यालय (बार्शी रोड) येथे निर्यातक्षम केळी परिसंवाद, तसेच राज्यस्तरीय दूध परिषद व एक दिवसीय भव्य कृषी मेळावा होत आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण, राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील, पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, राईस अँड शाईन बायोटेकच्या चेअरमन भाग्यश्री पाटील, सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, जयवंत कवडे, सुभाष घुले यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच यावेळी केळीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी कपिल जाचक, संजय बिरादार यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल.
शेतकऱ्यांनी पंढरपूर येथील केळी उत्पादक शेतकरी संघाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण व समन्वयक सचिन कोरडे पाटील यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The clarity and depth of your explanation are commendable. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?
[url=http://onionurls.biz]Wiki Links Tor[/url] Onion sites wiki Tor Tor Wiki urls onion