ताज्या बातम्यासामाजिक

पंढरपूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांचा अमृत महोत्सव संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार…

पंढरपूर (बारामती झटका)

जय श्री संत नामदेव श्री विठ्ठलाच्या कृपेने श्री संत नामदेवरायांच्या आशीर्वादाने निश्चितपणे खऱ्या अर्थाने न भूतो, न भविष्यती, असा नेत्रदीपक, उत्साहवर्धक, नवचैतन्य रुपी, धार्मिक व आध्यात्मिक दृष्टीने सुसंस्कृत सोहळा श्री क्षेत्र पंढरी नगरीत दि. 23 व 24 जुलै (बुधवार/गुरुवार) रोजी मोठ्या थाटामाटात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

23 जुलै रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः उपस्थित राहून धार्मिक चैतन्याचा व सात्विक ऊर्जेचा अनुभव घेणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व आदरणीय नामदेवांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी येणारे नामदेवरायांच्या भक्तांना राहण्याची, प्रसादाची व जेवणाची उत्तम सोय केल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष महेश ढवळे श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ यांनी दिली. आपल्या परिवारासहित श्री संत नामदेवरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम आहे, असे समजून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. श्रद्धा जवंजाळ सहसंयोजक व पिंक रेवोल्युशन संस्थेच्या अध्यक्षा यांनी केले.

तसेच इतर राज्यातील व देशातील आदरणीय समाजातील व्यक्तिमत्व सर्व सन्माननीय श्री संत नामदेवरायांच्या भक्तांना सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असून या कार्यक्रमांमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा फक्त नामदेवरायांचाच भक्त असेल. कारण, परमेश्वरापुढे सर्व लेकरं समानचं असतात. त्यामुळे प्रत्येकाने हा माझा कार्यक्रम आहे असे समजून दि. 23 व 24 जुलै रोजी दोन दिवस वेळात वेळ काढून आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शवून या चैतन्य, आनंदमयी ऊर्जा स्त्रोताचा आनंद घेऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच श्री संत नामदेवरायांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सहअध्यक्ष ह. भ. प. औसेकर महाराज यांनी यापूर्वीच केले आहे.

सध्याच्या सर्व भौतिक सोयी सुविधा उपलब्ध असताना सुद्धा धकाधकीच्या, तणावग्रस्त आयुष्यात खऱ्या सुखाचा शोध घेताना

“अंधार फार झाला,
पणती जपून ठेवा…”

त्यामुळे काळाची गरज असलेली मानवतेची, समतेची, एकतेची गुढी श्री नामदेवरायांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण हातात हात घालून पुढे नेऊयात… आणि श्री क्षेत्र पंढरपूर नगरी श्री संत “नामदेव जनाबाई” या नामघोषाने दुमदुमित करूयात असे अ. भा . श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री. केशवराज संस्था नामदेव मंदिर व श्री नामदेव शिंपी समाज पंढरपूर या संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom