ताज्या बातम्याराजकारण

पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व युवानेते रणजीतभैय्या शिंदे यांनी माढा विधानसभेचा गड राखला….

माढा लोकसभेच्या निवडणुकीत माढा विधानसभेत पिता-पुत्रांनी प्रामाणिक व दमदार कामगिरी केलेली आहे.

महाळुंग (बारामती झटका)

देशात व राज्यात बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रामाणिकपणे व दमदार कामगिरी, माढा विधानसभेचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन भावी आमदार रणजीतभैय्या शिंदे यांनी माढा विधान सभेचा गड राखला आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत माढा विधानसभेत पिता-पुत्रांनी प्रामाणिक व दमदार कामगिरी केलेली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित फेरबदल झालेले असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत वेगळे चित्र पाहावयास मिळालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेला होता. माढा विधानसभेचे षटकार आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळून माढा विधानसभा मतदारसंघात दमदार व प्रामाणिकपणे कामगिरी केलेली आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत झालेली आहे. माढा विधानसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे मोहिते पाटील परिवार यांचे विशेष लक्ष होते. पाणीदार आमदार बबनदादा शिंदे मोहिते पाटील यांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या मोहिते पाटील समर्थक व माढा तालुक्यातील जनाधार नसलेले नेते यांनी उडवलेल्या होत्या. मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांनी केलेले होते. माढा विधानसभा मतदार संघात पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी आजपर्यंत केलेली विकासकामे, मतदारांशी असलेला संपर्क, सुखदुःखामध्ये सहभागी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा अशा अनेक गोष्टींमुळे आमदार बबनदादा शिंदे व युवा नेते रणजीतभैया शिंदे यांच्यावर मतदारांचा विश्वास होता.

मतदार संघात कोणत्याही गावांमध्ये काही अडचण असल्यास पिता-पुत्र कायम जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आहेत. पहिल्यांदाच कमळ चिन्हाला मतदान करण्यासाठी पिता पुत्रांना मतदारांना प्रभावित करावे लागत होते. भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न, रस्ते व इतर विकासकामे करावयाची असल्याने सर्वांनी महायुतीचा धर्म पाळून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मतदार संघातून जास्तीत जास्त मताधिक्य घेण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांनी आ. बबनदादा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदारांनी भरघोस मतदान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केलेले आहे. विशेष म्हणजे माळशिरस तालुक्यातील १४ गावांनी सुद्धा जास्त मतदान केलेले आहे.

अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला महाळूंचे ग्रामदैवत यमाई देवीचा प्रश्न सोडवून मंदिर व मंदिर परिसर विकासाचे काम जोमाने सुरू होते. महाळुंग पंचक्रोशीतील यमाईदेवी भक्तसुद्धा खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम राहिलेले आहेत.

माळशिरस तालुक्यातील विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, महाळुंग नगरपंचायतीचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी निष्ठेने काम केलेले आहे. पिता-पुत्राचा प्रामाणिकपणा व दमदार कामगिरी केलेली असल्याने पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व युवा नेते रणजीतभैया शिंदे यांनी माढा विधानसभेचा गड राखून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असल्याची चर्चा माढा तालुक्यामध्ये सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button