पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्या अंदाजावर पाणी फिरवलं…
माळशिरस तालुक्यासह माढा मतदार संघ जयसिंह मोहिते पाटील यांच्या अंदाजाकडे लक्ष लावून बसलेला आहे….
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली. असे चित्र जरी असले तरीसुद्धा पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय आकडेमोडीच्या अंदाजावर पाणी फिरवलं असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात जयसिंह मोहिते पाटील यांच्या अंदाजाकडे लक्ष लावून बसलेले आहे. निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर राजकीय आकडेमोड करून उमेदवारांना मते किती पडतील, याचा अंदाज वर्तवत असतात. मात्र, मौन सर्व काही सांगून जात आहे, अशीही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप व महायुतीने पुनश्च उमेदवारी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिलेली होती. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय चित्र बदललेले होते. त्यातच माळशिरस तालुक्यातील पारंपारिक मोहिते पाटील विरोधक यांनी हात मिळवणी केलेली होती. मोहिते पाटील विरोधी गटातील काही नेत्यांना व कार्यकर्त्यांना मोहिते पाटील यांच्यासोबत जाणे पसंत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे समर्थन करीत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला होता. आजपर्यंतच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्याचे जाणते राजे असे सुप्रसिद्ध असणारे जयसिंह मोहिते पाटील यांनी राजकीय आकडेमोड करून जिल्हा परिषद, पंचायत समिती यावेळी किती सदस्य येतील, विधानसभेला व लोकसभेला मते किती पडतील, याचे सुद्धा भवितव्य वर्तवलेले होते. त्यामध्ये काही अंशी खरे ठरू अथवा न ठरू मात्र, आकडा ठामपणे सांगितला जात होता. हा जयसिंह मोहिते पाटील यांचा इतिहास आहे.
मात्र, माढा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात अनेक रखडलेले प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामध्ये सिंचनाचा प्रश्न प्रामुख्याने सोडवलेला आहे. त्यामध्ये अनेक दिवसापासून रखडलेली नीरा देवधर योजना मार्गी लावलेली असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील कायम दुष्काळी असणाऱ्या गावांच्या मतदारांमध्ये पाणीदार खासदार यांच्या कार्याविषयी आत्मीयता निर्माण होऊन उघड उघड मतदारांनी मतदान केलेले असल्याने अनेक राजकीय भवितव्य वर्तवणारे तोंड बंद करून बसलेले आहेत. निश्चितपणे, माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय आकडेमोड करणाऱ्या लोकांची अडचण होऊन बसलेली आहे. मात्र, आकडेमोडेवर ज्यांचा विश्वास आहे असे जयसिंह मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते त्यांच्या अंदाजाकडे लक्ष लावून बसलेले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.