पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा-देवघर चा मारला शेवटचा मास्टर स्ट्रोक – जयकुमार शिंदे

अशक्य होते ते शक्य केले…
दिल्ली (बारामती झटका)
बहुचर्चित व अनेक वर्ष दुष्काळी भागाचा रखडलेला प्रकल्प म्हणजे निरा-देवघर. पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पात लक्ष घालून आज खऱ्या अर्थाने सोडवला. दि. ३/१०/२०२३ रोजी केंद्रीय जलसंपदा विभागाच्या अर्थ व गुंतवणूक समितीची दिल्लीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस सुश्री देबश्री मुखर्जी, सचिव जलशक्ती मंत्रालय, उदय चौधरी निजी सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुनाले, कार्यकारी अभियंता कोडलकर आदी उपस्थित होते.



हा प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला केंद्र शासनाचे ६० टक्के अनुदान प्राप्त होईल. राज्य शासनाने ४०% अनुदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुर केले आहे.
राज्य सरकारने स्वतःचा वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला व त्याचे प्रत्यक्षात टेंडर निघाले व लवकरच काम सुरू होईल. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानत आहे. असे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. हा एकूण प्रकल्प ३९६७ कोटी रुपयांचा आहे.



आता हा प्रकल्प या वर्षाच्या मार्च अखेर टेंडर प्रोसेस होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. व माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवले जाणार व कायम दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाण्याच्या प्रश्नावर मास्टर स्ट्रोक मारला आहे.



नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng