पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सभासदांची दिवाळी गोड केली….

लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची सभासदांचे व समाजाचे हित जोपासण्याची परंपरा कायम ठेवली…
माळशिरस (बारामती झटका)
सातारा लोकसभेचे माजी खासदार लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांची सभासदांचे व जनतेचे हित जोपासण्याची परंपरा कायम ठेवत पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सभासदांची दिवाळी गोड केलेली आहे.
पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना, उपळावे या कारखान्यास गळीत हंगाम सन 2024 मध्ये घातलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कारखान्याकडून गाळपासाठी आलेल्या उसाच्या प्रति टन 01 किलो साखर 20/- रुपये प्रति किलो प्रमाणे दसरा व दीपावली सणानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी दि. 03/10/2024 ते दि. 05/10/2024 रोजी साखर वाटप करण्यात येणार आहे.
माळशिरस तालुक्यात अडीच हजाराच्या आसपास सभासदांनी ऊस गाळपसाठी दिलेला आहे. चांगला दर देऊन शेतकरी समाधानी केलेले आहेत तर साखर कमी दरात देऊन आनंदीत केलेले आहेत. जेवढा टन ऊस गेलेला आहे तेवढीच किलो साखर मिळणार असल्यामुळे सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गटातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करून सर्व शेतकरी बांधवांना दसरा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.