पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र….

माळशिरस (बारामती झटका)
भारत देशाचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्र पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे भारत देशाची जबाबदारी असताना व्यस्त कामातूनसुद्धा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहून शुभेच्छांचे बळ दिलेले असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे कार्य करण्यास ऊर्जा मिळत असते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंतप्रधान यांचे शुभेच्छापत्र आलेले असल्याने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते समर्थकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.