परतीच्या पावसाचा जोर, जिकडे-तिकडे पाणीच पाणी
मुंबई (बारामती झटका)
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (२५ सप्टेंबर) रोजी पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशा झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने दाणादाण उडाली. मुंबईत वाहतुकीचा खोळंबा झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे.
मंगळवारी रात्री आणि बुधवारी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. विदर्भात मात्र अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. विदर्भात मात्र अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.