वाढत्या आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे – डाॅ. प्रताप पवार.

अकलूज (बारामती झटका)
अकलूजमधील धन्वंतरी आयुर्वेदिक केंद्र मार्फत आयोजित केलेल्या अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माळशिरस तालुका जेष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबीरात पंढरपूरचे आयुर्वेदाचार्य डॉ. प्रताप पवार यांनी रूग्णांची काॅम्प्युराईज्ड फुल बाॅडी चेकअप व आयुर्वेदिक चिकित्सा केली.
अकलूजमधील धन्वंतरी आयुर्वेदिक केंद्राच्या सुप्रिया मुदगल, संतोष मुदगल यांच्याकडून वाढत्या आजाराचं प्रमाण लक्षात घेता आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरासाठी अकलूज गावच्या आसपास परिसरातून अनेक लोक आलेली होते. त्याचप्रमाणे अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने प्रत्येक उपस्थित व्यक्तीची ब्लडप्रेशर, हिमोग्लोबिन, शुगर, वजन, उंची पाहून उत्तम संपूर्ण शरीर तपासणी स्कॅनिंग मशीनच्या साहाय्याने केली गेली.

पंढरपूर येथील प्रख्यात आयुर्वेदाचार्य वीस वर्षाचा अनुभव असलेले तज्ञ डॉ. प्रताप पवार यांनी उत्तम आरोग्य कसे राखावे, आहार, सवयी, व्यायाम, प्राणायाम महत्त्व व योग्य आयुर्वेदिक औषध याबाबत मार्गदर्शन आणि सल्ला दिला.
या शिबिरासाठी अकलूज मधील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विनोदभाई दोशी, उपाध्यक्षा सौ. नयना शहा, सचिव ननवरे सर, सहसचिव सतेज दिवटे सर, कार्याध्यक्ष नाना देशपांडे, अष्टपुत्रे सर त्याप्रमाणे माळशिरस तालुका ज्येष्ठ महिला संघाच्या वसुंधरा देवडीकर, वैशाली कुलकर्णी आणि सर्व ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. त्याच प्रमाणे चिंतामणी मशीनरीचे ज्ञानेश कुलकर्णी, पशु चिकित्सक प्रकाश मोरे यांनी आरोग्य अभियान कार्यास पाठिंबा दिला.

या शिबिरसाठी भारतीय आरोग्य अभियान IMC टीमचे दादा गवळी, राजेंद्र चव्हाण, महादेव देवकाते, श्रेयस पवार, गीतांजली आयवळे, सारिका शिंदे, लक्ष्मी दळवी मॅडम, दळवी सर, संतोष मुदगल, उमेश जोशी यांचे सहकार्य लाभले. तसेच लक्ष्मीकांत कुरुडकर यांनी शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली. या आरोग्य शिबीराद्वारे घरोघरी आजारांवर नियंत्रण आणि वेळीच आयुर्वेदिक औषधी उपचार कार्य, निरोगी स्वस्थ शरीर हाच उद्देश असल्याचे आयोजक सौ. सुप्रिया मुदगल यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.