परभणीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुभाषदादा जावळे पाटील यांचे चार दिवसांपासून प्राणांतिक उपोषण सुरू – धनाजी येळकर पाटील
पुणे (बारामती झटका)
मराठा आरक्षण संघर्ष समिती समन्वय समितीचे सुभाषदादा जावळे पाटील यांच्या प्राणांतीक उपोषणाला छावा मराठा युवा महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत EWS चे आरक्षण मराठा पुर्ववत चालू ठेवावे. निजाम कालीन गॅजेट ग्राह्य धरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. मुलीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मुलांना देखील सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे. महाराष्ट्रात कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, अशा मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येऊ नये. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून मराठा बांधवाना कर्ज करण्यात यावे. आणि कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कठोर कारवाई करावी. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी (मुलां-मुलींसाठी) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची तात्काळ उभारणी करण्यात यावी. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांतील एकाला शासकीय नोकरी देण्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर उभारावे. या सर्व मागण्यांचा विचार करून राज्य सरकारने तात्काळ प्रश्न सोडवावेत. मराठा आरक्षण संघर्ष समिती समन्वय समितीचे सुभाषदादा जावळे पाटील यांच्या प्राणांतीक उपोषणाला छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील, संभाजी सेना, सुधाकर माने, मावळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे, स्वराज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष साहेबराव कैलणकर, मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य वैभव जाधव, आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
MPO77 >> Layanan Situs Resmi Slot Bet 200 Winrate Tertinggi Gampang JP