ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

पत्रकारांचे समाजातील काम आदर्शवत – ग्रामविकास तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जीवनगौरव व पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ सोलापूर

सोलापूर (बारामती झटका)

आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जीवनगौरव व पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी संपन्न झाला. या पुरस्कार वितरण समारंभात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जात असतो. पुरस्कारामुळे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो, तर इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पत्रकारांबरोबर आपले नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले असून आपल्या यशस्वी वाटचालीत पत्रकारांची मोलाची साथ लाभली आहे. पत्रकारांच्या आवश्यक सुविधेसाठी कायम प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री श्री. गोरे यांनी यावेळी सांगितले.

निःस्वार्थीपणे सतत २४ तास काम करणारा पत्रकार हा खर्‍या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. गुणवत्तापूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमातून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पत्रकारांनी चांगले काम करून समाजात चांगला आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जीवनगौरव व पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल बालाजी सरोवर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आमदार देवेंद्र कोठे, मराठी पत्रकार संघाचे सल्लागार राकेश टोळ्ये, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशअध्यक्ष मनीष केत, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून ते प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी पत्रकारांनी सातत्यानेच भरीव काम केले आहे. कोविड सारख्या काळात सर्व नागरिक घरात बसून होते. या काळात पत्रकारांनी रस्त्यावर उतरून काम केले आहे. त्यांनी केलेले काम समाजासमोर येते. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान होणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी केलेले काम महाराष्ट्रभर पोचले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान हा कार्यक्रमाची शोभा वाढविणारा आहे, असे गौरवउद्गार केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ यावेळी काढले.

यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना जीवन गौरव तर एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, दैनिक सकाळचे सह. संपादक सिद्धराम पाटील, झी २४ तासचे ब्युरोचीफ प्रताप नाईक, टीव्ही नाईनचे ब्युरोचीफ योगेश बोरसे, न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी राहुल झोरी यांना तसेच एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांचा पुरस्कार सक्रिय पत्रराज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी पत्रकारांना आधिस्विकृती पत्रिका देण्याची संख्या वाढवावी. सोलापूर विमानतळावरून हैदराबाद व तिरुपती विमान सेवा सुरू करावी अशी मागणी प्रस्ताविकात केली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom