पिलीव गावचे सुप्रसिद्ध डॉ. श्री. निलेश कांबळे यांची भाजपच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती….

पिलीव (बारामती झटका)
पिलीव, ता. माळशिरस गावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. निलेश पांडुरंग कांबळे यांची भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी माळशिरस तालुका अध्यक्ष ॲड. शरद महादेव मदने यांनी संघटनात्मक घोषणा केलेली आहे.
डॉ. निलेश पांडुरंग कांबळे हे पिलीव गावचे रहिवासी आहेत. बी. एच. एम. एस. शिक्षण पूर्ण करून गेल्या पंधरा वर्षापासून डॉक्टरकी व्यवसाय सुरू केलेला आहे. डॉक्टर व्यवसायाबरोबर दहा वर्षापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक जबाबदारी डॉ. निलेश कांबळे यांनी स्वीकारलेली आहे. डॉ. निलेश कांबळे यांच्या निवडीचे स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते माळी, पिलीव शहर अध्यक्ष प्रमोद भैस, पिलीव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चंद्रकांत जाधव, पिलीव पंचायत समिती गणाचे उमेदवार व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टर निलेश कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



