पिलीव व परिसरामध्ये प्रतीआयोध्यानगरीचे स्वरुप दिसुन आले
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पिलीव (बारामती झटक) रघुनाथ देवकर यांजकडून
सध्या आयोध्या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने गेली अनेक दिवसांपासून खेड्यापासून ते शहरापर्यंत व वाड्यावस्त्यांवरुन, घराघरांतून श्रीराम नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाच्या गजरात, शोभायात्रा व कलश आणि अक्षदा मिरवणूक अशा कार्यक्रमाची जय्यत तयारी दिसून आली.
तर प्रत्यक्ष २२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण हिंदुस्तानातील मानवी मनामनामध्ये एक स्वप्न पाहिलं जात होतं आणि हे स्वप्न गेली पाचशे वर्ष प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलं होतं. तो सोनियाचा दिवस व हिंदुस्थानातील इतिहासातील भाग्याचा दिवस म्हणजेच सर्वांचं आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येच्या सुबक आकर्षक व वर्णन करता येणार नाही. अशा भव्यदिव्य मंदिरामध्ये झाल्याचा क्षण आणि या उत्सवाच्या निमित्ताने पिलीव व परिसरामध्ये मध्यरात्रीपासून धारक धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होऊन काकड आरती, भजन, कीर्तन महाप्रसाद अशा कार्यक्रमाला सुरुवात होऊन प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये “श्रीराम जय राम जय जय रामच्या घोषामध्ये” श्रीराम उत्सव साजरा करण्यात आल्याचे दिसून आले.
पिलीव गावामध्ये एस.टी. स्टँड ते मुख्य पेठेतून गावच्या वेशीपर्यंत व तेथून श्रीराम मंदिरापर्यंत बालकांपासून ते युवकांपर्यंत व युवकांपासून वृद्धांपर्यंतच्या श्रीराम भक्तांनी भगव्या टोप्या, भगवे पोशाख, खांद्यावरती उपरणे आणि हाती भगवे झेंडे अशा पद्धतीने शोभायात्रेला सुरुवात होऊन श्रीराम मंदिराच्या समोर उभारलेल्या सभा मंडपात ह. भ. प. शुभम महाराज माने, मायणी यांच्या अमृतवाणीतून अतिशय मार्मिक धार्मिक स्वरूपाचे सुश्राव्य कीर्तन झाले असून उपस्थितांना श्री प्रभू रामचंद्र यांच्या कथेचा संपूर्ण भाग आपल्या कीर्तनातून सांगितला. श्रोतेवर्गानी मोठ्या प्रमाणामध्ये या बाल कीर्तनकाराला साथ दिल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमांमध्ये शुभ संदेश देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार मा. रामभाऊ सातपुते हेही आवर्जून उपस्थित होते. तसेच सर्व लोकप्रतिनिधी, तरुण मंडळाचे पदाधिकारी, वि. का. स. सेवा संस्थेचे पदाधिकारी, महिला ग्रामस्थ, पुरुष ग्रामस्थ व सर्व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिलीव, शिंगोर्णी, बचेरी, सुळेवाडी, काळमवाडी, फळवणी, कोळेगाव, तांदुळवाडी, शेंडे चिंच, कुसमोड, झिंजेवस्ती, चांदापुरी, गारवाड या ठिकाणच्या मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई प्रत्येकाच्या घराघरावरती भगव्या पताकाची गुढी असे सुंदर चित्र दिसून आले. त्यामुळे परिसरात प्रतिआयोध्येचे स्वरूप आल्याचे चर्चिले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great mix of humor and insight! For more, visit: READ MORE. What do others think?