पिलीव येथे दुध दरवाढीसाठी सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन, शेतकरी जनावरांसह रस्त्यावर

पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे पिलीव परीसरातील शेतकऱ्यांनी दुध दर वाढीसाठी जनावरे रस्त्यावर बांधुन रस्ता रोको आंदोलन केले. शासनाने दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये एवढा दर ठरवुन देऊनही सोलापूर जिल्हयातील खाजगी दुध संघ २५ ते २६ रुपये एवढा दर देत शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत आहेत. शासनाने ताबडतोब अशा दुध संघावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना ४० रुपये एवढा दर द्यावा. पशुखाद्याचे दर कमी करावेत, औषधावरील जिएसटी कमी करावा या प्रमुख मागण्यांसाठी पिलीव येथे पिलीव परीसरातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी बांधवांनी रस्ता रोको केला. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना सागर भैस, सचिन भैस, निशांत बगाडे, शिवराज पुकळे, राहुल मदने, विजय पिसे, राजेंद्र जामदार, जिवन गोरे, अजय खुर्द, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, आरिफखान पठाण, अशोक बगाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत शासनाने ताबडतोब खाजगी दुध संघाची मनमानी थांबवित दुधाला चांगला दर द्यावा, अशी मागणी यावेळी केली.

सदरच्या आंदोलनाप्रसंगी शयामतात्या मदने, कुसमोडचे सरपंच महावीर धायगुडे, तुषार लवटे, कल्याण जावळे, उत्तम करांडे, आनंद पाटील, राहुल भैस, शंकर बगाडे, लक्ष्मण वगरे, नबाजी मदने, शहाजी लेंगरे, सागर शेंडगे, शिंगोर्णीचे सरपंच अक्षय धांडोरे, बचेरीचे सरपंच विश्वजीत गोरड, जितेंद्र पाटील, डॉ. निलेश कांबळे, कुमार भैस, संतोष पडळकर, लहु पाटील यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, काळमवाडी, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी परीसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक एम. एम. पुजारी यांनी स्विकारले. या रस्ता रोको वेळी पिलीव पोलीस स्टेशनचे हवालदार पंडीत मिसाळ, सतीश धुमाळ, दत्ता खरात, अमित जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.