पिलीव येथे शिवनेरी दहिहंडी चा बिग बजेट कार्यक्रम संपन्न

पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शिवनेरी दहिहंडी हा फेस्टिवल माळशिरस तालुक्यातील मानाची दहिहंडी फेस्टिवल म्हणून याचा उल्लेख केला जातो. गेली ५ वर्षापासून ही परंपरा अखंडितपणे शिवराज पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सामाजिक भान ठेवून अबालवृद्ध सर्व परीवाराने एकत्र बसुन बघता यावा असा हा बिग बजेट कार्यक्रम अशी या शिवनेरी दहिहंडी कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे.
आज पुणे, मुंबई, बारामती याठिकाणी मोठे मोठे दहिहंडीचे कार्यक्रम होत असतात. आज माळशिरस तालुक्यात सुद्धा अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन माळशिरस तालुक्यातील नेत्यांनी करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याच माता, भगिनी, अबालवृद्ध शहरी भागात जे मनोरंजन होते त्याच मनोरंजनाची अनुभुती ग्रामीण भागात घेतील आणि हाच या फेस्टिव्हलचा उद्देश आहे, असे शिवराज पुकळे यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे महिलांच्या हस्ते पुजन करुन महिलांना सन्मान देण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमामध्ये घुंगराच्या तालावर थिरकण्यासाठी महाराष्ट्राची लोककला लावण्या घेण्यात आल्या. तसेच महिलांच्या आवडीच्या विविध सिरीयल फेम कार्यक्रमात उपस्थित होत्या. महाराष्ट्रात नावाजलेल्या रील्स स्टार तरुणी होत्या. हिंदी, मराठी आशा विविध सदाबहार गाण्यावर नृत्य या ठिकाणी प्रेक्षकांना पहायला मिळाले. त्यामुळे एकंदरीत हा शिवनेरी दहिहंडी फेस्टिवल हा एकदमच बिग बजेट कार्यक्रम होता, असे लोकांमधुन बोलले जात आहे.

यावेळी कार्यक्रमास माढा लोकसभा मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली जिल्हा बँक संचालक तानाजी पाटील, माळशिरस पं. स. मा. उपसभापती किशोर सुळ, आटपाडी मार्केट कमिटी सभापती संतोष पुजारी, बंडुशेठ कातुरे, अमोल मोरे, जि. प. सदस्या शिवप्रसाद अर्बन बँकेच्या चेअरमन ऋतुजा ताई मोरे, राष्ट्रीय बाल आणि महिला विकास परिषदेच्या महासचिव डॉ. श्रध्दा जवंजाळ, नगराध्यक्षा ताई वावरे, नगरसेविका रेश्मा टेळे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष नीता मगर, ओबीसी नेत्या अश्विनी भानवसे, शेतकरी विषयक कार्य करणाऱ्या स्वाती काळे, राष्ट्रवादी नेत्या पुनम भैस, भाजप नेते संजय देशमुख, अजय घाटे, आरीफ पठाण, शामतात्या मदने, जि. प. बांधकाम अभियंता शुभजित नष्टे, अक्षय वगरे, ॲड. राहुल लवटे, बाबा पुकळे, विकास कोकरे, आण्णासाहेब सुळ, महावीर धायगुडे, विश्वजीत गोरड, राजाभाऊ जामदार, कुमार भैस, जितेंद्र पाटील, दादासाहेब वगरे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रामे सुयोग्य आयोजन रामभाऊ गलांडे, ॲड. किशोर काळे, पत्रकार गणेश देशमुख, खंडु माने, गणेश घुले, भैय्या तरंगे, यश चोरमले, सुरज वाघमारे, ऋषी साठे, बाळराजे सुळ यांनी केले. तर सुत्रसंचलन लखनराज खांडेकर यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.